कोपरगाव शहर वृत्त
महसूलचा भ्रष्टाचार थांबेना,जनता दरबारात गोंधळ !

न्युजसेवा
कोपरगाव (नानासाहेब जवरे)
कोपरगाव येथील खरेदी केलेली सदनिका सातबारा उताऱ्यावर नोंदविण्यासाठी फिर्यदिकडून ६.५ हजारांची लाच घेतल्या प्रकरणी अटक केलेला तलाठी गणेश वैजनाथ सोनवणे व त्याचा सहकारी करण नारायण जगताप यांना नुकतीच अटक झालेली असताना अद्याप त्यापासून कोणताही बोध घेताना महसूल विभाग दिसत नाही कारण अशीच एक घटना काल आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या जनता दरबारात उघड झाली असून यातील तक्रारदार श्रीकांत मोहनलाल राठी यांनी रा.धारणगावरोड वरील रहिवासी असून त्याच्या सदनिकेची नोंद गत तीन वर्षापासून केली नसल्याची बाब उघड झाली आहे.त्याने आपल्याकडे तलाठ्याने एका दलाला मार्फत चक्क पंधरा हजार रुपये मागितले असल्याचा आरोप प्रसिध्दी माध्यमांसमोर केला आहे.

दरम्यान काही पत्रकारांनी कोपरगाव शहरात वाढेलेली अतिक्रमण यावर बोटं ठेवले आहे.त्यावर मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी आपण यावर पथक नियुक्त केल्याचा दावा केला आहे.तरीही येवला रोड,अण्णाभाऊ साठे परिसर आदी ठिकाणी अतिक्रमणे का वाढली ? असा सवाल केला असता आपण ३४ जणांना नोटिसा बजावल्या असल्याचा त्यांनी दावा केला असून आपली बोटे सोडवून घेतल्याचे दिसून आले आहे.
कोपरगाव शहर आणि तालुक्यात लाचलुचपत प्रकरणी व भ्रष्टाचाराच्या वाढणाऱ्या घटनांची दखल घेऊन कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ.आशुतोष काळे यांनी काल दुपारी ०२ वाजता तहसील कार्यालयातील सभागृहात जनता दरबार आयोजित केला होता त्यावेळी ही बाब उघड झाली आहे.

सदर प्रसंगी कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कारभारी आगवण,कोपरगाव चे तहसीलदार महेश सावंत,कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी,कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप,शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे,तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी,तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे,प्रभारी शिक्षण अधिकारी शबाना शेख,जलसंधारण अधिकारी पी.एस.खेमनर,सामाजिक वनीकरण अधिकारी निलेश रोडे,एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी रुपाली धुमाळ,वीज वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजय धांडे,उपकार्यकारी अभियंता डी.डी.पाटील,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे विनोद मेणे,गोदावरी डावा तट कालव्याचे उपविभागीय अभियंता पाटील,गोदावरी कालवे जलनि:सारण विभागाचे किरण तुपे,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता अशोक लोहरे,पंचायत समितीचे उपअभियंता एस.आर.दळवी,कृषी अधिकारी सचिन कोष्टी,पशुसंवर्धन अधिकारी डॉ.ए.एस.तांबे,पशुधन विकास अधिकारी डॉ.श्रद्धा काटे,पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब साबळे,बांधकाम विभाग उपअभियंता सी.डी.लाटे,ए.व्ही.लहारे,के.बी.तुपे,कनिष्ठ अभियंता अंजली वाघ,मंडळ कृषी अधिकारी एस.के.मलिक,मंडळ अधिकारी भाऊसाहेब कोळगे,वनविभाग वनपरिक्षेत्र अधिकारी वाय.जे.पाचरणे,पशुधन पर्यवेक्षक अंजली येळवंडे आदीसह मोठ्या संख्येनं तालुक्यातील नागरिक आपल्या समस्या घेऊन हजर होते.

दरम्यान महसूल विभागाच्या या भ्रष्ट गोंगाटात गोंगाटात आ.आशुतोष काळे यांनाही महसूल विभागाचा का कृत्याचा कंटाळा आला असावा असे त्यांच्या देहबोलीवरून दिसत होते परिणामी ते वारंवार जांभया देत असल्याचे दिसून आले आहे.
त्यावेळी तहसीलदार सावंत यांनी पुरवठा विभागात येत असलेल्या अडचणी वाचण्यास सुरुवात केली व सदर सर्व्हर तीन महिन्यापासून डाऊन होत असल्याने अडचणी वाढल्या असल्याचा दावा केला असताना नागरिकांनी आपल्या रेशन कार्डच्या अडचणींबाबत पाढा वाढला असून पैसे दिल्यावर सर्व्हर सुरू कसे होते असा कडवा सवाल केला आहे.त्याला उपस्थित नागरिकांनी जोरदार पाठींबा दर्शवला आहे.शिवाय संजय गांधी निराधार योजनेचे होत असलेल्या सावळ्या गोंधळावर प्रकाश टाकला असून मागील जनता दरबारात जवळके आणि धोंडेवाडी येथील केलेल्या तक्रारीचे निवारण अद्याप आठ महिन्यांनी केले नाही असा आरोप सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार नानासाहेब जवरे यांनी केला आहे.त्यानंतर एकही प्रकरण मंजूर केले नसल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान शिवार रस्ते खुले करण्याचे सरकारने धोरण असताना याकडे महसूल विभाग कानाडोळा करत असल्याचा आरोप केला आहे.महसूल अधिनियम १४३ खाली प्रकरणे दाखल करा असे आवाहन तहसीलदार यांनी केले असता तुम्ही जागेवर जाऊन सदर प्रकरणे निकाली का काढत नाही ? असा सवाल केला आहे.पाण्याच्या प्रवाहात किंवा शेतजमिनींच्या लागवडीबाबत शेतकऱ्यांना उपलब्ध मार्ग,रस्ते,प्रवेशामध्ये निर्माण होणारा अडथळा दूर करण्याचा आदेश देण्याचा अधिकार महसुल अधिनियम १९६६ अन्वये तहसीलदारांना देण्यात आले आहे.कलम ५ च्या पोटकलम २ द्वारे कायमस्वरूपी किंवा अनिवार्य आणि तात्पुरता आदेश देण्याचे अधिकार दिले गेले असताना त्याकडे कानाडोळा करून कागदपत्रीय अडचणीत आणण्याचे व कालहरण करण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात असल्याचा आरोप उपस्थित शेतकऱ्यांनी केला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांत आपापसात वाद,हाणामाऱ्या,होत असून दिवाणी दावे न्यायालयात वर्षानुवर्ष पडून राहत आहेत.त्यावेळी तहसीलदार सावंत यांनी आपण सदर काम करत असल्याचा दावा केला असून ते काम केवळ वानगीदाखल केल्याचे अनेकांनी उघड केले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे.दरम्यान अनेक ग्रामस्थांना भूसंपादनाचा मोबदला २४-२५ वर्षांनी मिळत नाही ही गंभीर बाब आहे.त्याकडे लक्ष वेधले आहे.
दरम्यान प्रारंभी उपस्थित पत्रकारांना बोलण्याची संधी आ.काळे यांनी दिली असता त्यांनीही याच प्रकारे तक्रारी करून महसूल विभागातील भ्रष्टाचारावर प्रहार केला आहे.व खूपच अनागोंदी माजली असल्याचा आरोप केला आहे.त्यामुळे यावेळी महसूल विभाग जनतेच्या रडारवर असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान या गोंधळात सदर जनता दरबार आवरता घ्यावा लागला असून आ.काळे यांनी उपस्थितांना आपले अर्ज आपल्याकडे द्यावे असे आवाहन करावे लागले त्यामुळे अन्य विभागांचा धांडोळा तसाच राहून गेल्याने संबधित अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास टाकला आहे.त्यात राष्ट्रीय महामार्ग सावळीविहीर ते कोपरगाव या रस्त्याचे संथ काम,झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख रस्त्याची लागलेली वाट,त्यामुळे वाढत असलेले अपघात,कोपरगाव नगरपरिषद हद्दीत होत असलेले रस्त्यांचे निकृष्ट काम आदी वर बोलण्याचे राहून गेल्याचे अनेकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.
दरम्यान महसूल विभागाच्या या भ्रष्ट गोंगाटात गोंगाटात आ.आशुतोष काळे यांनाही महसूल विभागाचा का कृत्याचा कंटाळा आला असावा असे त्यांच्या देहबोलीवरून दिसत होते परिणामी ते वारंवार जांभया देत असल्याचे दिसून आले आहे.दरम्यान कोपरगाव तालुक्यात वाढलेला भ्रष्टाचार त्यांनी तातडीने विभाग निहाय बैठका लावून कमी करावा व विधानसभेत या प्रकरणी आवाज उठवावा अशी मागणी अनेकांनी केली आहे.त्यावेळी त्यांनी आगामी काळात प्रत्येक विभागाच्या स्वतंत्र बैठका लावण्यात येतील असे माध्यमांना शेवटी सांगितले आहे.