जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

अनेक अडचणींवर मात करून तलाव अखेर केला पूर्ण – या नेत्याचा दावा!

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करण्यात अहंम भुमिकां निभावणाऱ्या साठवण तलाव क्रमांक पाचला अनेक विरोधकांनी तब्बल आठ वेळा न्यायिक अडचणी आणल्या आतापर्यंत २२ तारखा झाल्या आहेत.त्याला आपण पुरून उरलो असून अखेर साठवण तलावाचे जलपूजन केले असल्याचे प्रतिपादन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“कोपरगाव तालुक्यातील आपल्या विरोधकानी जलतरण तलाव कोठे बांधले,शहरातील राज्य परिवहन मंडळाचे बस स्थानक कसे बांधले त्याचा दर्जा कसा आहे हे तुम्हाला माहिती आहे.संगमनेरच्या बस स्थानकाकडे पहा.आणि तुलना करा असे आवाहन करून अद्याप आपणाला आगामी काळात अजून काम करायचे असून शहर राज्यात प्रथम क्रमांकावर न्यायचं आहे”- आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

  कोपरगाव शहरास पिण्याचे पाणी पुरविण्यात भविष्यात महत्वाची भूमिका असणाऱ्या पाच क्रमांकाच्या साठवण तलावास अखेर मुहूर्त सापडला असून आगामी रविवार दि.१५ सप्टेंबर रोजी दुपारी ५.३० वाजता ५ नंबर साठवण तलावाचे जलपूजन शहरातील सर्व साधू वृंदाच्या शुभ हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

कोपरगाव पाच क्रमांकाची तलावाची एकूण क्षमता ०९ मीटर उंची आहे पैकी आता ५.१५ मी.भरले आहे.एकूण क्षमता ४०० एम.एल.डी.आहे.५० टक्के भरले आहे.जुनी चार तळ्यांची एकूण क्षमता ६०० आहे पण गाळामुळे ४०० एम.एल.डी.वापर होतो आहे.जुने २४,१८,६,तासांचे नळ जोडणी बंद केल्याने सदर पाणी वितरण आता ०२ तासांवर आली असल्याचे नगरपरिषद म्हणत असली तरी वितरण व्यवस्था सदोष असल्याने पाणी दररोज मिळणे अशक्य असल्याचे मानले जात आहे.

सदर प्रसंगी महंत रमेशगिरिजी महाराज,परमानंद गिरिजी महाराज,सरला दीदी,शारदानंदगिरीजी माता, राजनंद महाराज,भंते कश्यप,फादर विशाल त्रिभुवन,धनंजयगीरिजी महाराज,महेंद्रगिरीजी.महाराज,हापिज बशीर,राज्य पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,पदमाकांत कुदळे,चैताली काळे,कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण,युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव,माजी गटनेते अजेय गर्जे,डॉ. अतिश काळे,सुनील शिलेदार,शहाराध्यक्ष सुनील गंगुले,बाळासाहेब आढाव,मेहमूद सय्यद,नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सप्नील निखाडे,मंदार पहाडे, विरेंन बोरावके,संदीप पगारे,पदाधिकारी,तहसीलदार महेश सावंत आदीसह बहुसंख्येने नागरिक,महिला उपस्थित होत्या.

   सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोपरगाव साठवण तलावाचे मोठे राजकारण झाले या तलावाच्या जागी मातीचे मोठे ढिगारे होते.ते आपण वरिष्ठ नेत्यांच्या मदतीने हटवले होते.हे माजी अध्यक्ष विजय वहाडणे यांना माहिती आहे रात्री ११ वाजता तांत्रिक मान्यता मिळवली.त्यांनतर विविध मान्यता मोठ्या कष्टाने मिळवल्या आहे.मात्र माजी आ.स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता काही लोकांनी न्यायालयात अडथळे आणले होते.तब्बल आठ वेळी न्यायालयात खटले गुदरले आहे.आतापर्यंत २२ तारखा झाल्या आहेत.त्याला आपण पुरून उरलो आहे.जनता आणि मतदार आदींना आपण दिलेला आशीर्वाद दिला तो कामी आला.१५ टक्के हिस्सा जवळपास २० कोटी रुपये नगरपरिषदेला भरावयाचा होता.त्यास शासनाकडून माफ करून आणला होता. व तलावाला गती दिली आहे.अनेकांनी अफवा पसरवली होती.आज सर्व अडचणींवर मात करून जलपूजन केले आहे.अजुन काम बाकी आहे आपण दिवसाआड पाणी देऊ शकणार आहे.
त्याच बरोबर आपण साठवण तलावांबरोबर शासकीय कार्यालये,न्यायालय इमारत,पोलीस ठाणे,वसाहत,आदींसाठी ७०० कोटी मंजूर करून आणले आहे.कोपरगाव शहराला राज्यात एक क्रमांकावर न्यायचे आहे.औद्योगिक वसाहत निर्माण होणार आहे.काहींनी अडचणी आणल्या कारण त्यांना राजकारण संपण्याच्या भीती पोटी या अडचणी आणल्या असल्याचा आरोप केला अहे.विरोधकानी जलतरण तलाव कोठे बांधले.बस स्थानक कसे बांधले हे तुम्हाला माहिती आहे.संगमनेरच्या बस स्थानकाकडे पहा.आपणाला आगामी काळात अजून काम करायचे आहे.कार्यक्रम चार तास उशिरा झाल्याचा खेद व्यक्त करून सर्वांचे आभार मानले आहे.
सदर प्रसंगी महिलांनी प्रतिनिधिक स्वरूपात आ.काळे यांचा सत्कार केला आहे

दरम्यान साडे तीनच्या सुमारास शहरात आ.आशुतोष काळे यांची राष्ट्रवादीच्या वतीने जाहीर मिरवणूक काढण्यात आली होती.त्यात अनेक जण सहभागी झाले होते

सदर प्रसंगी प्रास्ताविक जिल्हा बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी केले तर सूत्रसंचलन श्री चव्हाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुनील गांगुले यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close