जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

शहरात डासांसाठी औषध फवारणी करा-माजी नगराध्यक्ष

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

वर्तमानात कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणावर डासांची पैदास झाली असून त्यामुळे रोगराई वाढली आहे त्यामुळे नगर परिषदेने कोपरगाव शहरात डास प्रतिबंधक औषध फवारणी करावी अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष मंगेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.

“दरम्यान येत्या दोन दिवसात गोदावरी डाव्या कालव्याला पाणी येणार आहे असे कळते.या महिन्यात दुसऱ्यांदा पाणी येत आहे.सर्व तळे भरलेले असताना,आता परत पाणी येत आहे.असे असून देखील सुद्धा जनतेने मागणी करूनही आठ दिवसा आड होणारा पाणीपुरवठा नगरपालिकेने पूर्ववत चार दिवसात केलला नाही.हे आश्चर्य मानले जात आहे”-मंगेश पाटील,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

आजच्या घटकेला,माणसाच्या जीवाला सर्वात जास्त आणि अगदी सहज धोका उत्पन्न करू शकेल असा जगातील एकमेव कीटक म्हणजे ‘डास’ म्हणजेच ‘मच्छर’.डास अनेक रोगांचे वाहक असून,वर्षागणिक लाखो माणसांच्या मृत्यूला कारणीभूत ठरतात.इतकंच नव्हे,तर आता डासांद्वारे पसरणाऱ्या झिका विषाणूंचा संबंध,दक्षिण अमेरिकेतील हजारो नवजात अर्भकांच्या मेंदूत जन्मतःच दोष असण्याशी जोडला जातो.त्यामुळे पालिका शहारत फवारणी करून दरवर्षी डासांचे उच्चाटन करत असतात व नागरिकांचे जीवन सुसह्य करत असतात मात्र या वर्षी जुलै महिना संपत आला असताना अद्याप कोपरगाव नगरपरिषदेने डास प्रतिबंधक फवारणी केलेली नाही त्यामुळे मंगेश पाटील यांनी हि मागणी केली आहे.
त्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी पुढे पुढे म्हटले आहे की,”नियमाप्रमाणे पावसाळा सुरू होण्याच्या आधी व पावसाळा चालू झाल्यावर औषध फवारणी होणे गरजेचे होते.जून महिना संपला,जुलै संपत आला.तरी अद्याप नगरपालिका औषध फवारणी करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
दरम्यान येत्या दोन दिवसात गोदावरी डाव्या कालव्याला पाणी येणार आहे असे कळते.या महिन्यात दुसऱ्यांदा पाणी येत आहे.सर्व तळे भरलेले असताना,आता परत पाणी येत आहे.असे असून देखील सुद्धा जनतेने मागणी करूनही आठ दिवसा आड होणारा पाणीपुरवठा नगरपालिका हा पूर्ववत चार दिवसात केलला नाही.हे आश्चर्य मानले जात आहे.

कोपरगाव शहरातील रस्त्यांना पडलेली खड्डे देखील नगरपालिकेने बुजवले नाही तर दुसरीकडे नगरपालिका घरपट्टी चे वाटप मात्र घरोघरी जाऊन करत आहे व पट्टी भरण्यासाठी मागणी करत आहे.जनतेला सुविधा देण्याकडे दुर्लक्ष करायचे व दुसरीकडे एका अर्थाने जुलमी पद्धतीने आगाऊ कर वसूल करायचा असा नगरपालिकेचा सध्याचा अघोरी प्रकार चालू आहे.तरी नगरपालिकेने लोकांच्या जीवाशी न खेळता तात्काळ औषध फवारणी डास निर्मूलनासाठी करावी व पाणीपुरवठा हा पूर्ववत चार दिवसात तत्काळ करावा अशी मागणी पालिकेचे माजी अध्यक्ष मंगेश पाटील यांनी शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close