कोपरगाव शहर वृत्त
कोपरगाव शहराला पाणी कमी नाही,वितरणात दोष-महसूल मंत्र्यांचे खडेबोल

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहराला पाणी कमी नाही येथील वितरणात दोष असल्याचे खडे बोल राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्यासह कोपरगाव तालुक्यातील माजी आ.स्नेहलता कोल्हेना आज कोपरगाव येथील एका कार्यक्रमात सुनावले आहे.

कोपरगाव नगरपरिषदेत नगराध्यक्ष म्हणून आपली पाच वर्षांची कारकीर्द यशस्वी केल्याच्या निमित्त माजी अध्यक्ष विजय वहाडणे यांनी ‘कर्तव्य’ या पुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे हे होते.


सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र झावरे,भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आसाराम ढुस,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,महानंदचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव,काँग्रेसचे राज्य सचिव नितीन शिंदे,उद्धव सेनेचे शहराध्यक्ष सनी वाघ,मनसेचे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष नामदेव जाधव,माजी नगरसेवक मेहमूद सय्यद,डॉ.गोवर्धन हुसळे,समीर आंबोरे,पृथ्वीगिरी बिरारी,वैशाली गायकवाड,आदी मान्यवर उपस्थित होते.

“कोपरगाव तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून ७०० एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्रासाठी उपलब्ध व्हावे यासाठी महसूलमंत्री विखे यांना बोलावले असल्याचे सांगितले आहे.आपण संभाजी काळे,माजी आ.अशोक काळे,माजी खा.बाळासाहेब विखे,माजी आ.भानुदास मुरकुटे,स्नेहलता कोल्हे,नामदेवराव परजणे,पंडितराव जाधव आदींचा प्रचार केला पण आपल्या नगरपालिका निवडणुकीत कोणीही प्रचाराला आले नाही”-विजय वहाडणे,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगरपालिका.

त्यावेळी कोपरगावच्या औद्योगिक विकासाबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की,”रोजगार निर्मितीसाठी आपण समृद्धी महामार्ग जवळून जात आहे.त्याचा फायदा करून घेता येईल असा आशावाद व्यक्त केला आहे.शिर्डीत आय.पी.एल.सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे.सोनेवाडीची शेती महामंडळाची जागा विकसित करणार आहे.त्यात
उत्तर नगर जिल्ह्यात तरुणांना फायदा होईल व जिल्ह्याचे भविष्य निर्माण करील असे आश्वासन त्यांनी दिले आहे.त्यासाठी महिंद्रा आणि महिंद्रासह विविध उद्योगांचे प्रकल्प आणू त्यामुळे आगामी काळात मुंबई ठाणे आदी ठिकाणी जाण्याची गरज राहणार नाही.भिवंडीत आय.टी.पार्क होत आहे व आपल्या जिल्ह्यातील नागरिकांना तेथे जाण्यासाठी केवळ दीड तास लागणार आहे.त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यातील तरुणांना फायदा होणार आहे.
त्यावेळी कोपरगावचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची पुस्तिका प्रसिद्ध करताना माजी प्रदेशाध्यक्ष सूर्यभान वहाडणे यांचे कार्याची स्मृती आल्याशिवाय राहात नाही.त्यांचे प्रतिबिंब विजय वहाडणे यांच्या कार्यात दिसून येत असल्याचे गौरवोद्गार मंत्री विखे यांनी काढले आहे.त्यासाठी कोपरगावकरांनी यशस्वी प्रयोग करून वहाडणे यांना निवडून दिले आहे.विजयराव वहाडणे यांनी विचारासोबत सुसंगत काम केले आहे.भ्रष्टाचार मुक्त काम केले त्यामुळे काही लोकांची अडचण झाली आहे.त्यामुळे त्यांना विरोध झाला आहे.ते कवी असल्याने त्यांच्यात ही सहनशीलता आली असावी असा कयास व्यक्त केलं आहे.विकासासाठी व शहरास नियमित पाणी मिळण्यासाठी व त्यांना परत एकदा निवडून देण्याची गरज आहे.त्यासाठी त्यांना मदत करणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी उमा वहाडणे यांचेही त्यांनी कौतुक केले असून कोपरगाव शहर झोपडपट्टी मुक्त करण्यास आपण मदत करू असे आश्वासन दिले आहे.
सदर प्रसंगी ओमप्रकाश कोयटे यांनी माजी अध्यक्ष विजय वहाडणे यांनी,”कोपरगाव नगरपालिका हद्दीत सर्वात मोठे काम केले आहे.असे सांगून माजी महसूल मंत्री विखे यांनी कायमच सहकारी चळवळीला पाठिंबा दिला आहे.त्याबाबत कोपरगाव जिल्हा व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे.त्यासाठी सर्व सुविधा असल्याची आठवण दिली आहे.व शिर्डी जरी जिल्हा झाला तरी विकासाचा एखादा ओघळ कोपरगाव पर्यंत येऊ द्यावा अशी मागणी केली शहर आणि कोपरगाव तालुक्याचा विकास व्हावा अशी मागणी केली आहे.आमचेकडे तालुक्यात दिग्गज काळे-कोल्हे असूनही विकास होत नाही अशी खंत व्यक्त केली आहे.त्यावेळी कोयटे यांनी निळवंडेच्या जलवाहिणीची अनाठायी मागणी करून दुष्काळी जनतेची ५३ वर्षाची उपेक्षा केली आहे.
सदर प्रसंगी विजय वहाडणे बोलताना म्हणाले की,”आपण या पुस्तक प्रकाशनासाठी आपण सर्वांना निमंत्रण दिले पण विशेषतः भाजपचे शहाराध्यक्ष दत्ता काले यांना निमंत्रण दिले मात्र त्यांनी दबावात नकार दिल्याचा गौप्यस्फोट विजय वहाडणे यांनी केला केला आहे.आपल्या काळात आपण ६०० कोटींचे काम केली पण एकही बॅनर लावला नाही.प्रसिद्धी केली नाही.मात्र तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आपल्याला कोणत्याही शासकीय कार्यक्रमास बोलावले नाही,रस्त्यांची कामे नगरपरिषदेकडून काढून घेण्याचे पुण्य कर्म केले होते याचे शल्य बोलून दाखवले असून असून कार्यकर्त्याना कोपरगाव शहरातील दहशत मोडून काढण्याचे आवाहन केले आहे.सदर प्रसंगी त्यांनी त्यांच्या एका आढावा बैठकीत ९० टक्के वाळूचोर उपस्थित होते असा वस्तुस्थिती निदर्शक आरोप माजी कोल्हेचे नाव न घेता केला आहे.विनायक गायकवाड यांच्या एक जमिनीबाबद कायदेशीर काम होते ते कोल्हेच्या चमच्यानी बहुमताच्या जोरावर हाणून पाडले होते.अशी आठवण करून देऊन कोल्हेच्या समर्थकांनी,” तुम्ही आमच्या नेत्यांना भेटून घ्या तुमचे काम होईल” असा निर्लज्ज निरोप दिला होता.पण गायकवाड यांनी त्यास ठाम नकार दिला आहे.व आपल्याकडे असे एकनिष्ठ कार्यकर्ते असल्यानेच पालिका सर करता आली असल्याचे कौतुकोद्गार कफहले आहे.शहरातील कायदेशीर काम करताना कोणी नागरिकांना बेकायदेशीर अडवले तर आपण त्याच्या विरुद्ध उभे राहू असे आश्वासन दिले आहे.व शहरातील विकास कामांना मदत करणाऱ्या आ.काळे गटातील आठ नगरसेवक व अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद यांचे शेवटी आभार मानले आहे.
सदर प्रसंगी संत गोरोबाकाका यांच्या संरक्षण भिंतीचे लोकार्पण राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी भाजपचे माजी शहर प्रमुख विनायक गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा मंत्री विखे यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रमोद पाटील यांनी केले आहे तर उपस्थितांना नितीन शिंदे यांनी मार्गदर्शन करताना विजय वहाडणे यांनी कोपरगावच्या ०५ क्रमांकाच्या साठवण तलावाचे काम मार्गी लावले असल्याचे सांगितले आहे.पृथ्वीगिरी बिरारी,डॉ.गोवर्धन हुसळे यांनी उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त केले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री पिंगळे यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार विनायक गायकवाड यांनी मानले आहे.