जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी व दुग्ध व्यवसाय

सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या संस्थाचा कोपरगावात गौरव 

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक नामदेवराव परजणे पाटील यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संघाला वर्षभरात सर्वाधिक दुधाचा पुरवठा व सर्वाधिक दर देणाऱ्या प्राथमिक दूध संस्था,सर्वाधिक कृत्रिमरेतन गर्भधारणेचे काम करणाऱ्या कृत्रिमरेतकांचा गौरव संघाच्या कार्यस्थळावर नुकताच करण्यात आला आहे.

“सहकारातीत काम प्रामाणिक आणि निष्ठापूर्वक असेल तर सामाजिक आणि आर्थिक विकास करता येतो हे स्व.परजणे यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिलेले आहे.शेतकऱ्यांनी केवळ बँकांच्या कर्जाची अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःचे संघटन तयार करुन फंड उभारला तर शेती आणि शेतकऱ्यांचा विकास होण्यास वेळ लागणार नाही”-प्रा.डॉ.विजयकुमार वावळे,गोखले शिक्षण संस्थेचे एच.पी.टी.महाविद्यालय.

गोदावरी दूध संघाचे संस्थापक नामदेवराव परजणे पाटील यांचा अठरावा पुण्यस्मरण सोहळा संघाच्या कार्यस्थळावर संपन्न झाला.नाशिक येथील गोखले शिक्षण संस्थेचे एच.पी.टी. महाविद्यालयाचे प्रा.डॉ.विजयकुमार वावळे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.तर संघाचे अध्यक्ष राजेश परजणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

कार्यक्रमास स्टेट बँकेच्या नगर शाखेचे विभागीय व्यवस्थापक लिंबराज मोहोळकर,शाखा व्यवस्थापक शेवाळे,कृषी अधिकारी धनाजी भागवत,कोपरगांव शाखेचे व्यवस्थापक राजेंद्र संधानशिवे,व्यवस्थापक अमितकुमार दुबे,संघाचे संचालक राजेंदजाधव,उपाध्यक्ष संजय खांडेकर यांच्यासह संघाचे सर्व संचालक,पदाधिकारी, दूध उत्पादक उपस्थित होते.

डॉ.विजयकुमार वावळे यांनी आपल्या भाषणातून सहकारातीत काम प्रामाणिक आणि निष्ठापूर्वक असेल तर सामाजिक आणि आर्थिक विकास करता येतो हे स्व.परजणे यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिलेले आहे.शेतकऱ्यांनी केवळ बँकांच्या कर्जाची अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःचे संघटन तयार करुन फंड उभारला तर शेती आणि शेतकऱ्यांचा विकास होण्यास वेळ लागणार नाही असे सांगून डॉ.वावळे यांनी दूध व्यवसायातील संधीची माहिती दिली.नोकऱ्या आणि उद्योगाच्या योग्य दिशा मिळत नसल्याने देशातील तरुणांमध्ये प्रचंड अस्थिरता निर्माण झालेली आहे.यातून बाहेर पडण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना शेती आणि दुग्ध व्यवसायाकडे प्रवृत्त करावे असे आवाहनही त्यांनी केले.

संघाला वर्षभरात सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या विविध संस्थांचा मानपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.संघाचे कर्मचारी कै.गजानन कराळे यांच्या अपघाती निधनाबद्दल त्यांच्या कुटुंबीयांना २० लाख रुपयाचा आपघाती विम्याचा धनादेश यावेळी वितरीत करण्यात आला.

संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनीं प्रास्तविक केले कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी सूत्रसंचलन केले तर संचालक उत्तमराव माने यांनी आभार व्यक्त केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close