कृषी विभाग
प्लास्टिक विषाणूसाठी नवीन औषध-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अश्वमेध मागील अनेक वर्षांपासून व्हायरस विरुद्ध उपयोगी वनस्पतीं च्या संशोधनात कार्यरत आहे.या संशोधनातून विकसित झालेले भाजीपाला व फळ पिकातील व्हायरस वर प्रभावी असलेले अश्वमेध रिकव्हर हे उत्पादन नव्याने नाशिक येथे नुकतेच प्रकाशझोतात आणले आहे.
“मागील दोन वर्षांपासून टोमॅटो पिकात प्लास्टिक विषाणूने जोरदार आक्रमण करत या पिकाचे मोठे नुकसान केले आहे.चालू वर्षी देखील पाऊस उशिरा होत असल्याने या विषाणूंचा प्रवेश मोठ्या प्रमाणात झाला असून पुणे,नाशिक,अ,नगर,सोलापूर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील टोमॅटो लागवड त्यामुळे अडचणीत आला आहे”-डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे,किटकतज्ञ कोपरगाव.
अँटिव्हायरल प्रॉपर्टी असणाऱ्या वनस्पतींच्या अर्कापासून संशोधित केले आहे ते विविध प्रकारच्या विषाणूवर प्रभावी ठरत असल्याचे डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी सांगितले आहे.
मागील दोन वर्षांपासून टोमॅटो पिकात प्लास्टिक विषाणूने जोरदार आक्रमण करत या पिकाचे मोठे नुकसान केले आहे.चालू वर्षी देखील पाऊस उशिरा होत असल्याने या विषाणूंचा प्रवेश मोठ्या प्रमाणात झाला असून पुणे,नाशिक,अ,नगर,सोलापूर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील टोमॅटो लागवड त्यामुळे अडचणीत आला आहे. नेहमीचा येलो व्हेन मोझाईक विषाणू,स्पॉटेड विल्ट विषाणू हे इतर भाजीपाला पिकात आहेत. यात आता प्लास्टिक विषाणूची भर पडली आहे .
या विषाणूमुळे पिकाची उत्पादक क्षमता ३० ते ६५ टक्के इतकी कमी होते त्यामुळे विषाणू नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी नर्सरी अवस्थेत आणि एक महिन्याच्या आत रिकव्हर फवारणी करून या विषाणूवर नियंत्रण ठेवावे असे आवाहन अश्वमेध तर्फे शेवटी करण्यात आले आहे.