कृषी व दुग्ध व्यवसाय
शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेची श्रीरामपुरात जय्यद तयारी

न्यूजसेवा
श्रीरामपूर-(प्रतिनिधी)
श्रीरामपूर येथे शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय भव्य ऊस परिषद शनिवार दि.१६ एप्रिल रोजी श्रीरामपुरात नेवासा रोड वरील,”लक्ष्मी त्र्यंबक मंगल” कार्यालयात शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ दादा पाटील,व उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या प्रमूख उपस्थितीत सकाळीं ११ वाजता संपन्न होत असून याची जय्यद तयारी झाली असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.या बैठकीस राज्यातून शेतकरी कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्थित राहणार आहे.
“या परिषदेमध्ये प्रामुख्याने दोन कारखाने व दोन इथेनॉल कारखान्यामधील हवाई अंतराची २५ कि.मी.ची अट रद्द करावी अशी प्रमुख मागणी करण्यात येणार आहे.या खेरीज फेब्रुवारीनंतर तुटलेल्या शेतकऱ्यांच्या उसाला एकरी २५ हजार रुपये प्रतिटन नुकसान भरपाई मिळावी,गाळप अभावी शिल्लक राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या उसाला एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी आदी मागण्या करण्यात येणार आहे”-अड.अजित काळे,उपाध्यक्ष,शेतकरी संघटना .
महाराष्ट्र राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.प्रत्येक कारखान्याने गाळप क्षेमतेपेक्षा अतिरिक्त उसाची नोंद घेतली आहे मात्र गळीत होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे शेतकरी वर्गात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.आज कारखाने बहुतेक उसाचे गाळप करू शकले नाही.या संकटाच महावितरणने वीज तोडणी केली आहे.या शासनाने निर्माण केलेल्या सुलतानी संकटाच्या पार्श्वभूमीवर आगामी १६ एप्रिल रोजी,श्रीरामपूर येथील” लक्ष्मी त्रिंबक मंगल कार्यालय” या ठिकाणी सकाळी १०.३० वाजता राज्यस्तरीय ऊस परिषदेचे आयोजन केले आहे.
सदर परिषद मध्ये काही महत्वाच्या मागण्यांवर शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.
या राज्यस्तरीय परिषदेमध्ये प्रामुख्याने दोन साखर कारखाने व दोन इथेनॉल कारखान्यामधील हवाई अंतराची २५ कि.मी.ची अट रद्द करावी अशी प्रमुख मागणी करण्यात येणार आहे.या खेरीज फेब्रुवारीनंतर तुटलेल्या शेतकऱ्यांच्या उसाला एकरी २५ हजार रुपये प्रतिटन नुकसान भरपाई मिळावी,गाळप अभावी शिल्लक राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या उसाला एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी,स्व.गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार विकास महामंडळाची शेतकऱ्यांच्या बिलातून दहा हजार रुपये होणारी कपात रद्द करावी,सर्व शेतकऱ्यांचे वीज बिल पाटबंधारे पाणी पट्टी बिल कर्जमाफी मिळावी आदी महत्वपूर्ण मागण्या करण्यात येणार आहेत.शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी हा लढा असून सर्व शेतकरी बांधवांनी या भव्य ऊस परिषदेसाठी उपस्थित रहावे असे आवाहन शेतकरी संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते युवराज जगताप यांनी शेवटी केले आहे.