कृषी व दुग्ध व्यवसाय
कोपरगाव तालुक्यातील वीजबिल माफी करावी-मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकत्याच संपलेल्या रब्बी हंगामात पूर्ण दाबाने वीज मिळालेली नाही.या शिवाय रोहित्रे बिघडण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या होते त्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना राज्यातील महाआघाडी सरकारने वीज बिल माफ करावे अशी मागणी कोपरगाव येथील शेतकरी तुषार विद्वांस व प्रवीण शिंदे यांनी नुकतीच कोपरगाव येथील वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांचेकडे केली आहे.
“कोपरगाव तालुक्यात गत सहा ते आठ महिन्यापासून अतिशय कमी दाबाने वीज मिळत आहे.कायम खंडित स्वरूपात वीज पुरवठा होत आहे.अपुऱ्या विद्युत पूरवठ्या मूळे शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाचे मोठे नुकसान झाले आहे.त्यात विद्युत पंप,केबल,स्टार्टर जळणे आदींमुळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे.नदीत पाणी असूनही ते शेताला वेळेवर देता आले नाही.परिणामी कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे”-तुषार विध्वंस,शेतकरी कोपरगाव.
कोरोना साथीच्या कालखंडात वीज ग्राहकांना वीज बिल माफी करून मिळेल हि माहिती राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी देऊनही राज्यातील जनतेला तोंडघशी पाडले त्याला दोन वर्षही झालें नाही.दोन वर्ष कोरोना कालखंडाचे अतिशय वाईट गेले आहे.अशातच सरकारने घोषणा करूनही शेतकरी व घरगुती ग्राहकांना तोंडघशी पाडले आहे. यावर्षीही शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळाली नाही.मिळाली तरी पुरेशा दाबाने मिळाली नाही.नादुरुस्त रोहित्रे तर हि कायमची डोखेदुखी होती.रात्री वीज सोडून शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत वीज वितरण कंपनीने पाहिला आहे.त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे महाआघाडी सरकारने वीज बिल माफी करावी हि मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव येथून पुन्हा एकदा तुषार विध्वंस व प्रवीण शिंदे यांनी मागणी केली आहे.
त्यांनी कोपरगाव येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”कोपरगाव तालुक्यात गत सहा ते आठ महिन्यापासून अतिशय कमी दाबाने वीज मिळत आहे.कायम खंडित स्वरूपात वीज पुरवठा होत आहे.अपुऱ्या विद्युत पूरवठ्या मूळे शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाचे मोठे नुकसान झाले आहे.त्यात विद्युत पंप,केबल,स्टार्टर जळणे आदींमुळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे.नदीत पाणी असूनही ते शेताला वेळेवर देता आले नाही.परिणामी कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.जे काही कृषी उत्पन्न मिळाले आहे.त्याला बाजार भाव नाही.त्यामुळे राज्यातील महा आघाडी सरकारने शेतकऱ्यांची वीज बिल माफी करावी अशी मागणीही तुषार विध्वंस व प्रवीण शिंदे यांनी शेवटी केली आहे.