जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
उद्योग जगत

…या तालुक्यात होणार औद्योगिक वसाहत !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   मतदार संघातील बेरोजगार तरुणांना मतदार संघातच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कोपरगाव शहरात औद्योगिक वसाहत व्हावी यासाठी आ.आशुतोष काळेंचा पाठपुरावा सुरु असून त्याबाबत कोपरगाव शहरातील जागेच्या पाहणीसाठी वसाहतीच्याअधिकाऱ्यांनी गुरुवार दि.०८ मे रोजी पाहणी केली असल्याची बातमी हाती आली आहे.त्यामुळे तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे.

  

कोपरगाव औद्योगिक वसाहत व्हावी यासाठी आ.आशुतोष काळे यांनी तत्कालीन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली होती; त्यासाठी कोपरगाव शहरालगत असणारी पशुसंवर्धन विभागाच्या मालकीची जागा वर्ग झाल्यास जागेचा प्रश्न मिटणार असून एम.आय.डी.सी.उभारण्याला वेग मिळणार आहे.त्यासाठी नुकतेच औद्योगिक अधिकारी यांनी भेट दिली आहे.त्याबाबत तालुक्यातील तरुणांनी समाधान व्यक्त केले आहे.

    कोपरगाव मतदार संघातील औद्योगीक वसाहतीचा प्रश्न अनेक दशकांपासून प्रलंबित आहे.सर्व प्रथम माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी या जागेची मागणी करून त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यासमोर नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवली होती.त्यानंतर आ.काळे यांनी यात पुढाकार घेवून एम.आय.डी.सी.ला जागा मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू केला होता.त्याबाबत तत्कालीन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली होती; त्यासाठी कोपरगाव शहरालगत असणारी पशुसंवर्धन विभागाच्या मालकीची जागा वर्ग झाल्यास जागेचा प्रश्न मिटणार असून एम.आय.डी.सी.उभारण्याला वेग मिळणार आहे.त्यासाठी हि जागा लवकरात वर्ग करण्याबाबत मागणी केली होती.त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा उचल घेतली असून दसऱ्याच्या मुहूर्तावर सावळीविहिर-सोनेवाडी शिवारात शिर्डी एम.आय.डी.सी. व डिफेन्स क्लस्टरचा भूमिपूजन समारंभ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते संपन्न झाला होता.त्यावेळी त्यांनी कोपरगाव शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहत येथील जिल्हा उद्योग केंद्राच्या मालकीची ७१.७५ हेक्टर,डेअरी पोल्ट्री अँड ब्रिडिंग फार्मचे मालकीची ८६.४० हेक्टर व अॅग्रीकल्चर कोपरगांव कॅटल ब्रिडिंग सेंटर फार्मचे मालकीची १५.१९ हेक्टर अशी एकूण १७३.३४ हेक्टर (४३३ एकर) जागा उपलब्ध असून सदरची जागा एम.आय.डी.सी.कडे वर्ग करून त्याठिकाणी उद्योग व्यवसाय सुरु करण्याची घोषणा करावी अशी मागणी केली होती.

   दरम्यान उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी एम.आय.डी.सी.साठी ४३३ एकर जागा विनामुल्य देण्याचे जाहीर करून लवकरच मंजुरी देणार असल्याचे आश्वासन आ.काळेंना दिले आहे.त्याला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील दुजोरा दिला आहे हे विशेष ! त्यामुळे बेरोजगारांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

   दरम्यान या हालचालीतून गुरुवार दि.०८ रोजी एमआयडीसीच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी गणेश राठोड,क्षेत्र व्यवस्थापक दिलीप काकडे, प्रमुख भूमापक फुलचंद कातकडे आदी अधिकाऱ्यांनी कोपरगाव शहरातील जागेची पाहणी केली असल्याची माहिती आहे.त्यामुळे बेरोजगार युवकांच्या आशा पल्लवित झाल्या असल्याचे मानले जात आहे.याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.यावेळी जागा पाहणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी,माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close