जाहिरात-9423439946
आंदोलन

कोपरगावात…या कार्यकर्त्यांना अटक,प्रतिबंधात्मक आदेश लागू

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा


कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्य सरकारचा महत्वाकांक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्ग टप्पा क्रं.२चे उदघाटन उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित संपन्न होत असताना काँग्रेसचे राज्य सरचिटणीस नितीन शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला असताना आज जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड करून त्यांना सोडुन दिले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

“आपण कोपरगाव तहसीलदार यांना काल दिलेल्या निवेदनात निळवंडेचे कालव्याना पाणी सोडावे व ते तातडीने पूर्ण करावे,कांद्यासह शेतमालाला हमी भाव द्यावा,अवकाळीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी आदी मागण्या केल्या होत्या“-नितीन शिंदे,चिटणीस प्रदेश काँग्रेस.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले.उद्घाटन केलेला मार्ग ५२० किमी लांबीचा असून तो नागपूर ते शिर्डीला जोडतो.शिर्डीला मुंबईशी जोडणारा घोटीपर्यंतचा ८० कि.मी.चा उर्वरित कॉरिडॉर आता पूर्ण झाला असून त्याचे उदघाटन उद्या दि.२६ मे रोजी सकाळी संपन्न होत आहे.त्याच्या उडघाटनाची जोरदार तयारी झाली असून ती अंतिम टप्प्यात असताना काँग्रेसचे राज्य सरचिटणीस नितीन शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मंजूर करण्यासाठी उद्या काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला होता.तर सदर कार्यक्रम सुखरूप पार पडावा यासाठी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी,यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियमचे कलम ३७ (१) नुसार २ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक, मतदान,मतमाेजणी व जयंती साजरी हाेणार आहे.सभा,महासभा,आंदाेलनाच्या काळात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी २ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले असल्याचे म्हटले आहे.

प्रतिबंधात्मक आदेशानुसार शस्त्रे,भाले,दंडुके, बंदुका आदी वस्तू बाळगण्यास मनाई आहे. त्याचप्रमाणे कोणतेही स्फोटक पदार्थ जवळ बाळगण्यास बंदी घातली आहे.त्यामुळे कोपरगाव शहर पोलीस दक्ष झाले असून त्यांनी आज आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे.व त्यांना कोणताही अनुचित प्रकार करणार नाही असे बंधपत्र लिहून घेऊन त्यांना सोडून दिले असल्याची माहिती हाती आली आहे.
सदर प्रसंगी विजय जाधव,उपाध्यक्ष जिल्हा किसन काँग्रेस कमिटी,सुनील साळुंखे जिल्हा सरचिटणीस,रावसाहेब टेके,चंद्र जगताप, ज्ञानेश्वर पाटील भगत,चंद्रकांत बागुल,महादेव नाना जगताप,राजू भाई,छोटू पठाण,रौनक अजमेरे,सोपान धेनक,राहुल गवळी,लक्ष्मण फुलकर आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close