जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

मागण्या न सोडविल्यास पुन्हा आंदोलन-कोपरगावात इशारा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेच्या जुन्या प्रभाग क्रमांक १२ व नवीन प्रभाग क्रमांक १३ मधील अनेक भागात रस्ते,गटारी,पाण्याची पाईपलाईन अशा अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या त्याकडे कोपरगाव नगरपरिषदेने दुर्लक्ष केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली लाक्षणिक उपोषण केले होते.या आंदोलनाची कोपरगाव नगरपरिषदेने दखल घेवून नवीन प्रभाग क्रमांक १३ मधील सर्व विकासाच्या समस्या सोडविण्यात येतील असे लेखी आश्वासन दिले आहे.

“या उपोषणाची कोपरगाव नगरपरिषदेने दखल घेवून सदर समस्या तातडीने सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक यांनी दिली असून समस्या सुटल्या नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने कोपरगाव नगरपरिषद कार्यालयावर हल्ला बोल आंदोलन करणार आहे”-अजीज शेख,कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस,कोपरगाव.

कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील नवीन प्रभाग क्रमांक १३ मधील विकासाच्या समस्या तातडीने सोडवाव्यात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोपरगाव नगरपरिषदेला लेखी निवेदन दिले होते.या निवेदनात गोरोबा मंदिराच्या मागील स्मशान भूमीचे निधीची चौकशी करणे,अंबिका मेडिकल ते दत्तनगर जाधव वखार रस्ता,जाणेफळ गल्ली रस्ता,हनुमाननगर कब्रस्थान रस्ता,हनुमाननगर साईनाथ नेटारे घर रस्ता,दत्तनगर नारायण कुंढारे घर रस्ता,इंदिरानगर,दत्तनगर,गांधीनगर येथील पिण्याचे पाणी पाईपलाईन दुरुस्ती,दीपक घाटे घर ते तायरा आपा घर रस्ता,इंदिरानगरच्या संतोषीमाता मंदिर ते उत्तम चव्हाण घर रस्ता,अंगणवाडी दुरुस्ती,दत्तनगर,गोरोबानगरच्या शौचालयाची दुरुस्ती,दत्तनगर मधील डुकरे,मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे व आरोग्य आदी समस्या सोडविण्याच्या मागण्या करण्यात आल्या होत्या.या मागण्या पूर्ण न केल्यास लाक्षणिक उपोषण करण्याचा ईशारा देण्यात आला होता.

त्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते अजीज शेख,शंकर गंगुले,अजगर खाटिक,अल्ताफ पठाण,समीर शेख,तालीफ शेख,इस्त्राईल शेख,समद शेख,मुक्तार शेख,फिरोज पठाण,नईम शेख,बिलाल शेख आदी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोमवार दि.०५ डिसेंबर रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते.सदर उपोषणाची कोपरगाव नगरपरिषदेने दखल घेवून उपोषणकर्त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना निवेदनात देण्यात आलेल्या समस्या तातडीने सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शेख यांनी दिली असून समस्या सुटल्या नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने कोपरगाव नगरपरिषद कार्यालयावर,”हल्ला बोल आंदोलन” करणार असल्याचा ईशारा त्यांनी शेवटी दिला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close