जाहिरात-9423439946
आंदोलन

कोपरगावात महसुली कर्मचाऱ्यांचा संप सुरु,कामावर प्रतिकूल परिणाम

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)राज्यातील कोपरगाव तहसील कार्यालयासह तब्बल बावीस हजार महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.महसूल कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे राज्यातील कामकाजावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.कोपरगावातही त्याचा प्रतिकूल परिणाम पाहायला मिळाला आहे.आपल्या मागण्यासाठी येथील कर्मचाऱ्यांनी तहसीलदार विजय बोरुडे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.

“नायब तहसीलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाण ३३ वरून २० टक्के करावे.महसूल विभागात सहायकांची रिक्त पदे तातडीने भरावीत.पदोन्नतीची प्रक्रिया विहित कालमार्यादित पार पाडावी.२७ नव्या तालुक्यांत विविध कामकाजांसाठी पदनिर्मिती करताना महसूल विभागातील अस्थायी पदे स्थायी करावी.पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वर्ग-३ पदावर पदोन्नती द्यावी”-वाय.डी.पालवे,अव्वल कारकून,कोपरगाव तहसील कार्यालय.

त्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”राज्य महसूल कर्मचाऱ्यांनी या पूर्वी नाशिक येथे २० फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय बैठक घेऊन सरकारला इशारा दिला होता पण त्यांनी त्याची दखल घेतली नाही.सदर बैठकीत अव्वल कारकून,मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती होत नाही त्यामुळे महसूल विभागात महसूल सहाय्यकाची रिक्त पदे मोठ्या प्रमाणत वाढली आहे.त्यामुळे एका महसुली कर्मचाऱ्यांकडे दोन-तीन संकलनाचा कार्यभार असून त्यांच्यावर कार्याचा अतिरिक्त भार वाढला जात आहे.त्यामुळे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर मानसिक दबावात काम करत आहे.भरली जात नाही राज्यात महसूल सहाय्यकाची चाळीस टक्के पदे रिक्त आहे.त्या बाबत अत्यावश्यक सेवा म्हणून सदरची पदे भरणे गरजेचे आहे.मात्र सरकार त्याकडे कानाडोळा करत आहे.त्यामुळे सरकार विरुद्ध कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.सदर निवेदनासोबत या कर्मचारी संघटनेने दि.२१ फेब्रुवारी रोजी दिलेले निवेदन जोडले आहे.या निवेदनावर नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी,महसूल अव्वल कारकून सी.एस.कुलथे,वाय.डी.पालवे,आर.एस.उदावंत,श्री पोकळे,डी.आर.घोरपडे,के.एस.खोडके,के.के.शिंदे.बी.एस.एन.आमले,एम.फरताळे,आर.एफ.चौरे,एस.एस.बनसोडे,आर.एस.शिरसाठ,एस.टी.गोंदके,डी.एम.भिंगारदिवे,आदींच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close