जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

कोपरगावातील..’त्या’ गोहत्येबाबत महंत रामगिरीजी महाराज यांचा इशारा !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

“कोपरगावातील अवैधपणे होणारी गोवंश हत्या व गोदावरीच्या पवित्र नदीतील रक्तपात थांबला नाही तर व त्या पापात सहभागी होणाऱ्यांना संवादाने विषय समजला नाही तर ‘तो’ लाथाने समजावा लागेल” असा कडक इशारा श्री क्षेत्र सराला बेट येथील महंत रामगिरीजी महाराज यांनी नुकताच दिला आहे.त्यामुळे अवैध गोवंश हत्त्या करणाऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

“कोपरगाव शहरात अवैध गोवंश कत्तल करून गोदावरी नदीत रक्तपात होत आहे.हि अत्यंत निंदनीय बाब आहे.त्यावर,”प्रशासनास वारंवार निवेदने देऊन व आंदोलने करून त्यांची भाषा समजत नसेल तर आम्हाला त्यांना समजेल अशा भाषेत उत्तर द्यावे लागेल”,जुनी एक म्हण असून,”लाथों के भूत,बातों से नहीं मानते”त्यांना समजेल अशा भाषेत उत्तर देऊ”-महंत रामगिरीजी महाराज,श्री क्षेत्र सराला बेट.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव नगरपरिषदेच्या हद्दीत संजयनगर परिसरात वारंवार अवैध कत्तल खाणे सुरु असल्याचे सिद्ध होत असून त्या ठिकाणी गोवंश कत्तल होत आहे.तीन वर्षांपूर्वी ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गोवंश कत्तल झाल्याचे निष्पन्न झाले होते. ते रक्त मिश्रित पाणी पवित्र गोदावरी नदीत जात असून त्याच पाण्याने हिंदू देवदेवतांचा अभिषेक होत आहे.या व अशा अनेक अत्यंत निंदनीय घटना वारंवार उघड झाल्या आहेत.या बाबत शहरातील हिंदू संघटनांनी नुकताच कोपरगाव नगरपरिषदेवर व शहरातील तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला होता.त्यात नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांनी जबाबदारीचे खापर एकमेकावर फोडले होते.त्याचे पडसाद उमटले असून कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी नुकतीच या समाजाच्या शिष्टमंडळाची नरपालिकेत बैठक घेऊन त्यांना याबाबत कडक समज दिली आहे.त्या नंतर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनीही याबाबत कडक इशारा दिला होता.त्यावर पुन्हा एकदा दि.१९ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३५ वाजता पुन्हा तेवीस गोवंश जनावरे वाहतूक करतानाची धक्कादायक घटना उघड झाली आहे.या पार्श्वभूमीवर महंत रामगिरीजी महाराज यांनी हा कडक इशारा दिला आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”आम्हाला काही कोपरगावातील हिंदुत्व वादी भाविक येऊन भेटले आहे.त्यांनी अवैध गोवंश हत्या बेकायदेशीर पणे सुरु असल्याचे वृत्त दिले आहे.व त्यातून हिंदू धर्माचा अपमान होत आहे.गोदावरी नदीत रक्तपात होत आहे.हि अत्यंत निंदनीय बाब आहे.त्यावर,”प्रशासनास वारंवार निर्देश देऊन व आंदोलने करून त्यांची भाषा समजत नसेल तर आम्हाला त्यांना समजेल अशा भाषेत उत्तर द्यावे लागेल” असा इशारा देऊन जी भाषा समजत नसेल तर जुनी एक म्हण असून,”लाथों के भूत,बातों से नहीं मानते”त्यांना समजेल अशा भाषेत आम्हाला समजून द्यावे लागेल.जर यावर प्रशासनाला आमची भाषा समजत नसेल तर त्यांना समजेल अशा भाषेत समजून सांगायला आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल” असा कडक इशारा महंत रामगिरीजी यांनी शेवटी दिला आहे.त्याबाबत त्यांनी चलचित्र फित सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित केली आहे.त्यासाठी आमच्या प्रतिनिधीने सराला बेटात संपर्क करून त्याची सत्यता पडताळली आहे.त्यास त्यांचे सहकारी ह.भ.प.मधुकर महाराज कडलग यांनी दुजोरा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close