आंदोलन
उजनी योजनेद्वारे पाझर तलाव भरून द्या -…या संरपचाची मागणी

न्युजसेवा
कोपरगाव- (प्रतिनिधी)
निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील बहुतांशी पाझर तलाव,गाव बंधारे,के.टी.वेअर भरणार असले तरी अंजनापुर (पूर्व),जवळके,धोंडेवाडी, बहादराबाद,शहापूर आदी गावातील पाझर तलाव कोरडेठाक राहणार असल्याने ते पिण्यासाठी आणि पशुधणासाठी भरून द्यावे अशी मागणी जवळके ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका विजय थोरात यांनी जलसंपदा विभागासह आ.आशुतोष काळे यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

“दिनांक ३१ मे २०२३ रोजी निळवंडे कालव्यांची पहिली चाचणी करण्यात आली होती.त्या चाचणीत आणि त्या नंतर दोन आवर्तनं जलसंपदा विभागाने दिली आहेत.या पावसाळ्यात वरील चार गावे,वाळकी,कोरहाळे आदी गावात तर राहुरी तालुक्यातील वडनेर आदी ठिकाणी पाणी पोहचले नव्हते परिणामी वरील गावे पाण्यावाचून वंचित राहिली आहे.त्यामुळे आगामी काळात या गावांना टंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवणारअसल्याने उजनी चारी द्वारे जबळके सह चार गावांचे पाझर तलाव भरून द्यावे”- सारिका विजय थोरात,सरपंच, जवळके,ग्रामपंचायत.
निळवंडे धरणाचे लाभक्षेत्रातील दुष्काळी १८२ गावात चालू वर्षी पुरेसे पर्जन्यमान झालेले नाही.त्यामुळे यावर्षी मोठी टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.मात्र निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवारे,अध्यक्ष रुपेंद्र काले,समितीचे पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी,शेतकऱ्यांनी मोठे जन आंदोलन उभारून व उच्च न्यायालयात शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांचे मोफत विधी सहाय्याने कालवे पूर्ण करण्यात येऊन आता बंदिस्त पाईप चाऱ्यांची कामे सुरू झाली आहे.त्यामुळे दिनांक३१ मे २०२३ रोजी निळवंडे कालव्यांची पहिली चाचणी करण्यात आली होती.त्या चाचणीत आणि त्या नंतर दोन आवर्तनं जलसंपदा विभागाने दिली आहेत.या पावसाळ्यात वरील चार गावे,वाळकी,कोरहाळे आदी गावात तर राहुरी तालुक्यातील वडनेर आदी ठिकाणी पाणी पोहचले नव्हते परिणामी वरील गावे पाण्यावाचून वंचित राहिली आहे.त्यामुळे आगामी काळात या गावांना टंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील नैऋतेकडील दुष्काळी गावातील जवळके,धोंडेवाडी,अंजणापुर, बहादराबाद,शहापूर आदी गावांना उजनी उर्फ रांजणगाव देशमुख उपसा सिंचन योजना सुरू करून पाझर तलाव के.टी.वेअर आदी भरून द्यावे परिणामी दूध,शेती व्यवसाय अडचणीत येणार नाही.शिवाय पशुधनाचा चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर येणार नाही असे आवाहन सरपंच सारिका विजय थोरात,सदस्य भाऊसाहेब थोरात,मीना विठ्ठल थोरात,वनितारखमा वाकचौरे,इंदुबाई नवनाथ शिंद,गोरक्षनाथ वाकचौरे आदींनी केली आहे.