जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

रत्याची लागली वाट,ग्रामस्थांची आंदोलनाची धमकी !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील आनंदवाडी येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० पासून नाला नं.२९ च्या लगतच्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून
या रस्त्याने येण्या-जाण्याकरता नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी तहसीलदार महेश सावंत यांना भेटून आंदोलनाचा इशारा दिला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

  

कोपरगाव तालुक्यात पाऊस कमी आणि अवसान जास्त अशी स्थिती आढळून येतअसताना व हजारो कोटी रुपये आणल्याचे मोठमोठे दावे केले जात असले तरी मात्र रस्त्याचे वास्तव वेगळे असल्याची भावना ग्रामस्थांतून पसरली आहे.त्यामुळे चांदेकसारे येथील ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  या प्रकरणी सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यात पाऊस कमी आणि अवसान जास्त अशी स्थिती आढळून येत आहे.हजारो कोटी रुपये आणल्याचे मोठमोठे दावे केले जात असले तरी मात्र वास्तव वेगळे असल्याची भावना ग्रामस्थांतून पसरली आहे.पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले असले तरी अद्याप विहिरींची भूजल पातळी वाढलेली नाही.मात्र थुईथुई पावसावर पिके जोमदार वाढली असून सदरचा पाऊस तनपोशा झाला आहे.त्यामुळे पाऊस जास्त नसताना केवळ रस्ते खराब करण्याची त्यांनी कुठलही कसर सोडली नाही परिणामी राज्य मार्गासह ग्रामीण रस्त्यांची वाट लागली आहे.त्याला कोपरगाव तालुक्यातील रस्ते अपवाद नाही.कोपरगाव तालुक्यातील रस्ते मोठया प्रमाणावर नादुरुस्त झाले आहे.झगडेफाटा ते जवळके (संगमनेर ) हा मार्ग त्याचे उत्तम उदाहरण ठरावे.त्यातच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० पासून नाला नं.२९ लगतच्या ३ किमी रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडलेले होते व आहे.या एकूण ३ किमी लांबीच्या रस्त्याचा उपभोग वहिवाटीसाठी व दैनंदिन कामकाजासाठी या भागात राहणारे असंख्य नागरिक घेत आहेत या सर्व नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने व दैनंदिन गरजेच्या दृष्टीने हाच एकमेव रस्ता असून हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे.

  मात्र महामार्गाच्या बाजूने ४०० मीटर डांबरीकरण झालेले आहे त्यानंतर मध्येच ७०० मीटर रस्ता अत्यंत खड्डे पडलेले आहेत.त्यानंतर पुन्हा ४०० मीटर रस्ता हा पावसाळा सुरू होण्याच्या बेताने खडीकरण व डांबरीकरण झाला मात्र त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे.तेथून पुढे उर्वरित संपूर्ण रस्ता अतिशय खराब झालेला आहे रस्त्यावर मोठ मठे खड्डे पडलेले आहेत.रस्त्याची रुंदी त्याच्या पूर्व वहिवाटीनुसार कमी केलेली आहे साईड पट्ट्याचे काम अपूर्ण आहे.मात्र संबंधित विभागाचे अधिकारी या रस्त्याकडे लक्ष देत नाहीत आम्ही अनेक वेळेस याबाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केलेले आहेत मात्र तक्रारीकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात येत आहे.या रस्त्याने शाळेतील जाणाऱ्या येणाऱ्या मुलांना देखील प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी या प्रकरणी तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.या निवेदनावर यावेळी राहुल होन,सुनिल बोंडखळ,बापूराव होन,शुभम होन,द्वारकानाथ गव्हाणे,ज्ञानदेव सरोदे,दत्तात्रय होन,संदीप जावळे,तुकाराम लांडबले,मनोज गंगावणे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close