जाहिरात-9423439946
आंदोलन

पेन्शनधारकांच्या लढ्यात सहभागी राहणार-…या माजी खासदारांचे आश्वासन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

उत्तर नगर जिल्ह्यातील पेन्शनधारकांच्या लढ्यात आपण कायम अग्रस्थानी राहू असे आश्वासन शिर्डी लोकसभा मतदार संघाचे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी नुकतेच शिर्डी येथे एका कार्यक्रमात बोलताना दिले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या नोव्हेंबर २०२२ च्या एक आदेशानुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (EPFO)ने काही नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत,ज्यामुळे तुम्हाला आत्ताच्या नियोजित निवृत्तीवेतनापेक्षा जास्त पेन्शन मिळू शकते.त्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे.


शिर्डी येथे ईपीएस ९५ पेन्शनर मेळावा माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे.त्यावेळी ते बोलत होते.

   सदर प्रसंगी महिला आघाडी अध्यक्षा शोभाताई आरस,सचिव सरिता नारखेडे,महाराष्ट्र उपाध्यक्षा आशा शिंदे,जिल्हाध्यक्ष संपतराव समिंदर,तालुकाध्यक्ष बापूराव बहिरट,अशोक देशमुख,वाळके अप्पा,दशरथ पवार,राजुस्कर,आयुब शेख,साहेबराव वाघ,चिंतामणी,रायभान तुपे,सुलेमान शेख आदींसह बहुसंख्य नागरिक  पेन्शनर उपस्थित होते.

   सदर पेन्शनर मेळाव्यास मार्गदर्शन करताना राष्ट्रीय अध्यक्ष अशोक राऊत यांनी,”दिल्ली येथे श्रम मंत्री,श्रम सचिव आणि भविष्य निधी अतिरिक्त आयुक्त,मुख्य आयुक्त यांचे समवेत झालेल्या बैठकींची सविस्तर माहिती देवून सकारात्मक निर्णय होऊन लवकरात लवकर मागणी मंजूर करण्यासाठी राष्ट्रीय संघर्ष समिती प्रयत्नशील आहे.त्यामुळे या महिना अखेरीस आपणास निश्चित चांगली बातमी मिळेल असे जाहीर केले आहे.सदर पेन्शन वाढ मिळण्यासाठी आपण सर्व प्रकारचे प्रयत्न केले असून आता जबाबदारी सरकारची आहे.आपण मागे हटणार नाही.सर्वांनी एकजुटीने काम करावे लागेल असे शेवटी आवाहन केले आहे.

    सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देविसिंग जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार गंगाधर तुरकाने यांनी मानला आहे.
तर मेळावा यशस्वीतेसाठी दशरथ पवार,सुभाष आरसुळे,संपत शेळके,पुंजाहरी कोते,भाऊसाहेब साबळे,भागवत खंडीझोड,सुरेश कटारिया,शिवाजी गिरी,शिवनाथ सोनवणे आदींनी परिश्रम घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close