आंदोलन
धर्मग्रंथाची विटंबना करणाऱ्या आरोपीस अटक करा-मागणीसाठी आंदोलन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथे धार्मिक ग्रंथाची विटंबना करणाऱ्या आरोपीस अटक करावी,खोटे आरोप करून धुडगूस घालणाऱ्यांवर कारवाई करावी,भडकाऊ भाषण करून धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी,आदी मागण्यांसाठी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने मंगळवारपासून कोपरगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख आदी लक्ष ठेवून होते.परिस्थिती नियंत्रणात व शांत आहे.मात्र पोलिसांना अद्याप सदर घटनेतील आरोपीचा शोध का लागला नाही हे एक कोडे बनले आहे.
महाराष्ट्रातील अ.नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील ग्रामपंचायत हद्दीत दि.१० ऑगष्ट रोजी रात्री १२ नंतर ते आज सकाळी ०६ पूर्वी अज्ञात इसमाने धार्मिक ठिकाणी प्रवेश करत तेथे ठेवलेले सुमारे ८-१० धार्मिक ग्रंथातील ७-८ ग्रंथ फाडून त्याची पाने अन्यत्र विखरून टाकली असल्याची घटना आज सकाळी उघड झाली आहे.त्यामुळे एका गटातील नागरिकांनी गावात एकत्र जमत या घटनेचा निषेध व्यक्त केला होता.तर त्याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यावर मोठा जमाव जमून आला होता व त्यांनी आरोपीस अटक करण्याची मागणी केली होती.घटनेची माहिती मिळताच शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके,पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड आदींनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांततेचे आवाहन केले होते.

दरम्यान आज सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी आंदोलनस्थळी भेट दिली असून आरोपीचा शोध घेऊ असे आश्वासन देऊनही अद्याप आंदोलन सुरूच असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
तथापि घटनेला आठ दिवस उलटून गेल्यानंतरही आरोपीला अटक न झाल्याने शुक्रवार (दि. १८ ऑगस्ट रोजी) समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने कोपरगाव तहसील समोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता.त्यानुसार मंगळवार दि.२२ ऑगस्ट पासून तहसील कार्यालयासमोर मुस्लिम समाजाच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी उपोषण स्थळी घडलेल्या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.आरोपीस तत्काळ अटक करण्याची मागणी उपस्थित नेत्यांच्या वतीने करण्यात आली आहे.तसेच समाजात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या उपद्रवींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.या उपोषणाला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शविला.आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना देण्यात आले आहे.
दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख आदी लक्ष ठेवून होते.परिस्थिती नियंत्रणात व शांत आहे.मात्र पोलिसांना अद्याप सदर घटनेतील आरोपीचा शोध का लागला नाही हे एक कोडे बनले आहे.
सदर प्रसंगी उपोषणकर्त्यांमध्ये फिरोज पठाण,अकबर शेख,अय्याज कुरेशी,शरफुद्दीन सय्यद,अजिज शेख,नवाज कुरेशी,अन्सार शेख,वसीम चोपदार,जावेद शेख,अमजद शेख,इरफान शेख,तौसीफ मणियार,इम्रान शेख,फिरोज पठाण,इरफान कुरेशी,अस्लम शेख,नदीम अत्तार,जुनेद खाटीक,नदीम शेख आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.