जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

पोलिसांचा अवैध व्यावसायिकांवर छापा,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील एक हॉटेल व्यावसायिक आपल्या आर्थिक फायद्यासाठी अवैध रित्या दारू विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून कोपरगाव तालुका पोलिसांनी टाकलेल्या धाडीत आरोपी राहुल भारतराव दळवी रा.पाटील गल्ली,माजलगाव,जी.बीड हा आपल्या, ‘हॉटेल साईनाथ शेरे पंजाब’ यात वेगवेगळ्या कंपन्यांच्या दारू बाटल्या विकत असताना आढळून आला आहे त्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने अवैध व्यावसायिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांनीं आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन रविवार दि.२० ऑगष्ट रोजी रात्री ११.१० वाजेच्या सुमारास त्या ठिकाणी धाड टाकली असता सुरेगाव शिवारातील शहा रोडचे लगत असलेल्या ‘हॉटेल साईनाथ शेर-ए- पंजाब’ या ठिकाणी देशी विदेशी दारू विक्री करताना आढळून आला आहे.

अलीकडील काळात अवैध व्यवसायिकांनी मोठा उच्छाद मांडला होता.त्याची दखल कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनीही घेतली असल्याचे दिसत असून दि.२० ऑगष्ट रोजी त्यांना एका गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की,सुरेगाव हद्दीत एक हॉटेल चालक हा आपल्या हॉटेलच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर दारू विक्री करत आहे.त्यानुसार पोलीस अधिकारी देसले यांनीं आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन रविवार दि.२० ऑगष्ट रोजी रात्री ११.१० वाजेच्या सुमारास त्या ठिकाणी धाड टाकली असता सुरेगाव शिवारातील शहा रोडचे लगत असलेल्या ‘हॉटेल साईनाथ शेर-ए- पंजाब’ या ठिकाणी देशी विदेशी दारू विक्री करताना आढळून आला आहे.त्याच्या हॉटेलच्या कॉऊंटरवर विविध देशी विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत.

दरम्यान जप्त केलेल्या मालात त्यात १,२६० रुपये किमतीच्या १८ देशी दारू भिंगरी संत्रा कंपनीच्या १८० मी.ली.च्या सीलबंद कॉर्टर,याशिवाय ४२० रुपये किंमतीच्या ०६ देशी दारू हापुस आंबा कंपनीच्या १८० मी.ली.च्या,८०० रुपये किंमतीच्या ०८ गोवा जीन दारू सीलबंद १८० मि.ली.च्या असा एकूण ०२ हजार ४,८० रुपयांचा माल आढळून आला आहे.

दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून त्यावर कारवाई केली आहे.व कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.४१७/२०२३ महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५(ई) प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.श्री.वांढेकर हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close