जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

कोपरगाव तालुक्यातील ‘तो’ शिवार रस्ता अखेर खुला !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
दहिगावात ‘तो’शिवार रस्ता खुला !

कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका येथील शहीद सुनिल रावसाहेब वल्टे यांना सन-२०१९ मध्ये वीर गती प्राप्त झाली. त्यानंतर त्यांचे वीर पिता व वीर पत्नी यांनी त्यांचे शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी वारंवार मागणी करूनही त्याकडे महसूल विभागाने दुर्लक्ष केले होते.त्याबाबत आंदोलन करण्याचा इशारा दिल्यावर आज महसूल प्रशासनास जाग आली असून त्यांनी सदर शिवार रस्ता खुला करून दिल्याने वल्टे कुटूंबासह काळे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान आज अखेर संजय काळे त्याबाबत तालुका तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी दखल घेतली असून आज सदरचा रस्ता तब्बल चौदा वर्षाने मोकळा करून दिला आहे.न्यायालयीन दावा हि तडजोडीने मिटवला आहे.त्याबाबत वल्टे कुटुंबासह संजय काळे यांनी कोपरगाव तालुका पोलीस अधिकारी व कोपरगाव महसूल विभागाच्या या कार्यवाही बाबत समाधान व्यक्त केले आहे.

शेतकऱ्याला स्वत:च्या शेतजमिनीमध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल,तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम-१९६६ च्या कलम १४३ अन्वये नवीन रस्त्यासाठी अर्ज करता येतो.हा रस्ता शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधावरून दिला जातो.यासाठी शेतकऱ्यांना तहसिलदारांकडे एक लेखी अर्ज करावा लागतो.मात्र बऱ्याच वेळा रस्ता देऊनही शेजारचे शेतकरी तो नंतर नांगरून टाकल्याची अनेक उदाहरणे आहेत.अशीच घटना नुकतीच उघड झाली असून त्यात दहिगाव बोलका येथील शेतकरी व शहीद जवान सुनील वल्टे यांच्या पश्चात त्यांच्या शेतात जाणारा रस्ता नजीकच्या शेतकऱ्यांनी जवळपास चौदा वर्षांपासून बंद करून टाकल्याने व सदर वाद न्यायालयात पोहचल्याने तो वाद मिटता मिटत नव्हता.त्यांनी महसूल प्रशासनाकडे सदर रस्त्याची मागणी केली होती.मात्र त्याकडे महसूल विभागाने सोयीस्कर दुर्लक्ष केले होते.त्याबाबत माहिती अधिकार संजय काळे यांनी नूकतेच स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी शहीद जवानाच्या नातेवाईकांना निमंत्रण द्यायला गेले असता शाहिद जवान सुनील वल्टे यांचे पिताश्री रावसाहेब वल्टे यांनी हि बाब संजय काळे यांच्या निदर्शनास आणून दिली होती.त्याबाबत काळे यांनी महसूल विभागाचे दोन तीन वेळा लक्ष वेधून घेतले होते.व चरालगतचा रस्ता खुला करून मागितला होता.

दरम्यान त्याबाबत अधिकाऱ्यांनी दि.१४ ऑगष्ट हि तारीख देऊनही त्याकडे कानाडोळा केला होता.अखेर काळे यांनी महसूल व पोलीस प्रशासनास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.व आज दि.१८ ऑगष्ट रोजी सकाळी ०७ वाजेच्या सुमारास कोपरगाव तहसिल व पोलीस ठाणे यांच्या समोर नारळ अर्पण करून मार्गस्थ झाले होते.कोपरगाव ते दहिगाव बोलका या मार्गावर १७ कि.मी.पायी दिंडी नेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता.व सकाळी ते मार्गस्थ झाले होते.

दरम्यान आज अखेर संजय काळे त्याबाबत तालुका तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी दखल घेतली असून आज सदरचा रस्ता तब्बल चौदा वर्षाने मोकळा करून दिला आहे.न्यायालयीन दावा हि तडजोडीने मिटवला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्याबाबत रावसाहेब वल्टे कुटुंबासह संजय काळे यांनी कोपरगाव तालुका पोलीस अधिकारी व कोपरगाव महसूल विभागाच्या या कार्यवाही बाबत समाधान व्यक्त केले आहे.सदर प्रसंगी कोपरगाव तहसीलदार संदीपकुमार भोसले, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,मंडलाधिकारी श्री गोसावी,कामगार तलाठी श्री चाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close