आंदोलन
स्वातंत्र्यदिनी समृद्धीवर शेतकऱ्यांचे आंदोलन !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
काल पंधरा ऑगष्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मंगळवारी समृद्धी महामार्गावर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सिन्नर तालुक्यातील दुसंगवाडी येथे आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलकांनी शिर्डीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वरील वाहतूक सुमारे अर्धा तास अडवली असल्याची माहिती आंदोलन कर्ते डॉ.विजय शिंदे यांनीही आमच्या प्रतिनिधीस दिली आहे..यावेळी पोलिसांनी बाळाचा वापर करून आंदोलकांना बाजूला करत वाहतूक पूर्ववत केली आहे.
“सदर आंदोलन प्रसंगी समृद्धी लगतच्या शेतकऱ्यांचे पावसाळ्यात होणारे पाणी जाण्यासाठी मार्ग निर्माण करावा,त्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी व शेतीचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना कराव्या.प्रकल्पाच्या उभारणीदरम्यान झालेल्या अपघातांमध्ये जीव गेलेल्या दहा स्थानिक तरुणांच्या वारसांना रस्ते विकास महामंडळामार्फत कायमस्वरूपी नोकऱ्या द्याव्यात.सेवा मार्गाची अर्धवट कामे पूर्ण करावी”-डॉ.विजय शिंदे,सायाळे कार्यकर्ते,ता.सिन्नर.
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख,वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे,महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहअभियंता निंबादास बोरसे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना आंदोलन न करण्याची विनंती केली.२८ ऑगस्ट रोजी सिन्नर तहसील कार्यालयात समृद्धी बाधित शेतकरी आणि रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याची माहिती तहसीलदार देशमुख यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.सायाळे येथील कार्यकर्ते डॉ.विजय शिंदे,नितीन अत्रे,भास्कर कहांडळ,आप्पा शिंदे,भास्कर वारूंगसे,मधुकर वारुंगसे,जगदीश ढमाले,सुभाष शिंदे,काशिनाथ कांदळकर,महेश वाघ,भागवत घोडे,बाळासाहेब राऊत,शांताराम पांगारकर,अक्षय कहांडळ,गोरख गारे यांच्यासह परिसरातील पन्नास ते पंच्याहत्तर शेतकरी यावेळी उपस्थित होते.त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे व डॉ.शिंदे व त्यांच्या कार्यकर्त्यांत आंदोलन स्थगितीबाबत बाचाबाची झाली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
दरम्यान शेतकऱ्यांनी या प्रसंगी समृद्धी लगतच्या शेतकऱ्यांचे पावसाळ्यात होणारे पाणी जाण्यासाठी मार्ग निर्माण करावा,त्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी व शेतीचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना कराव्या.प्रकल्पाच्या उभारणी दरम्यान झालेल्या अपघातांमध्ये जीव गेलेल्या दहा स्थानिक तरुणांच्या वारसांना रस्ते विकास महामंडळामार्फत कायमस्वरूपी नोकऱ्या द्याव्यात.सेवा मार्गाची अर्धवट कामे पूर्ण करावीत.समृद्धीसाठी वापरले गेलेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी या महत्वपूर्ण मागण्या केल्या आहेत.सरकारकडे वारंवार मागणी करूनही त्याकडे सरकारने दुलक्ष केले असल्याचा आरोप केला असून सदर मागण्याची राज्य सरकारने समृद्धी बाधितांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अशी मागणी डॉ.शिंदे यांनी शेवटी केली आहे.