आंदोलन
शिवार रस्त्यासाठी शेतकऱ्याचे कोपरगावात आंदोलन !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आपला शेतशिवार रस्ता शेजारी शेतकऱ्याने नांगरून टाकला असून तो पूर्ववत करून द्यावा अशी मागणी घेऊन आज कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथील शेतकरी कचरू गणपत रहाणे यांनी कोपरगाव तहसील कार्यालयासमोर,’आमरण उपोषण’ करून केली आहे.सदर आंदोलन त्यांनी तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी आश्वासन दिल्यानंतर सोडून दिले असल्याची माहिती रहाणे यांनी दिली आहे.
शेतकऱ्याला स्वत:च्या शेतजमिनीमध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल,तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम-१९६६ च्या कलम १४३ अन्वये नवीन रस्त्यासाठी अर्ज करता येतो.हा रस्ता शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधावरून दिला जातो.मात्र बऱ्याच वेळा रस्ता देऊनही शेजारचे शेतकरी ‘तो’ नंतर नांगरून टाकल्याची अनेक उदाहरणे आहेत.अशीच घटना नुकतीच उघड झाली असून त्यात बहादरपूर येथील शेतकरी कचरू रहाणे यांचे संबंधी घडली असून त्यांनी आज तहसील समोर आंदोलन केले आहे.
शेतकऱ्याला स्वत:च्या शेतजमिनीमध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल,तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम-१९६६ च्या कलम १४३ अन्वये नवीन रस्त्यासाठी अर्ज करता येतो.हा रस्ता शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधावरून दिला जातो.यासाठी शेतकऱ्यांना तहसिलदारांकडे एक लेखी अर्ज करावा लागतो.मात्र बऱ्याच वेळा रस्ता देऊनही शेजारचे शेतकरी तो नंतर नांगरून टाकल्याची अनेक उदाहरणे आहेत.अशीच घटना नुकतीच उघड झाली असून त्यात बहादरपूर येथील शेतरकी कचरू रहाणे यांचे त्याच गावात उत्तरेस शेतजमीन असून त्यात जाण्यासाठी त्यांना रस्ता असताना शेजारी असलेल्या शेतकऱ्याने ‘तो’ त्यांच्या पश्चात नांगरून टाकल्याने त्यांना सदरहू जमिनीमध्ये जाणं-येणं करण्यासाठी गाव नकाशावर रस्ता शिल्लक राहिला नव्हता.त्यामुळे शेतात बैलगाडी-ट्रॅक्टरमधून शेती अवजारं,बी-बियाणं आणि रासायनिक खतं नेण्यास अडचणी निर्माण होत होत्या.तसंच शेतातील माल सोयाबीन,तूर,मका, उडीद,मूग,गहू,बाजरी,ज्वारी,हरबरा,घरी आणण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या.त्याबाबत त्यांनी अनेक दिवसापासून महसूल अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देऊन सदर रस्ता मोकळा करून मिळावा यासाठी लेखी पत्रव्यवहार केला होता.मात्र त्याची दखल कोणीही घेतली नाही.त्यामुळे अखेर त्यांनी,’आमरण उपोषणाचा’ मार्ग पत्करला होता.
त्यासाठी त्यांनी अगोदर दि.१० जुलै रोजी अर्ज देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता.मात्र त्यानंतरही महसुल विभागाकडून हालचाल झाली नाही.अखेर त्यांनी आज सकाळी ११ वाजता कोपरगाव तहसील कार्यालयासमोर,’आमरण उपोषणाचा’ निर्णय घेतला होता.व त्या नुसार आज ते ‘आमरण उपोषण’ सुरु केले होते.
दरम्यान त्यांच्या आंदोलनाची आज दुपारी चार वाजेच्या सुमारास तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी दखल घेतली असून त्यांचेशी समक्ष चर्चा करून त्यांनीं मंडलाधिकारी पोहेगाव यांना स्थळ पंचनामा करण्याचा आदेश दिला आहे.व सदर रस्ता वस्तुस्थिती पाहून न्याय देण्याचे असे आश्वासन दिले आहे.त्यामुळे आंदोलन कर्ते शेतकरी कचरू रहाणे यांनी समाधान व्यक्त केले आहे.