शैक्षणिक
“आत्मा मालिक” शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाचे ५८ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहे.इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीमध्ये ४९ विद्यार्थ्यांसह ग्रामीणमध्ये राज्यात प्रथम स्थानी तसेच पाचवी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी मध्ये ०९ विद्यार्थी चमकले.आज पर्यंत या शाळेचे ५१९ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत आले आहेत अशी माहिती प्राचार्य निरंजन डांगे यांनी दिली आहे.
“आत्मा मालिक पॅटर्नचे हे यश असून शिष्यवृत्ती परीक्षेतील हे यश शिक्षक व विद्यार्थ्यांची मेहनत,या पॅटर्न अंतर्गत राबविले जाणारे विविध उपक्रम,सराव चाचण्या,नैदानिक चाचण्या,स्मार्ट संडे,सुपर नाईट अभ्यासिका,ज्यादा तयारी वर्ग,मिशन गरुडझेप वर्षभर राबविल्याने हे उद्दिष्ट साकार झाले आहे”-नंदकुमार सूर्यवंशी,अध्यक्ष,आत्मा मालिक,कोकमठाण.
या विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे विभाग प्रमुख अनिल सोनवणे,सागर अहिरे,सचिन डांगे,रमेश कालेकर,रवींद्र देठे,बाळकृष्ण दौंड पर्यवेक्षक सुनील पाटील,नितीन अनाप,नयना आदमाने विषयशिक्षक राहुल जाधव,अनिता कोल्हे,रवींद्र धावडे,मनोहर वैद्य,दिपाली भोसले,किशोर बडाख,गणेश रासने,तनुजा घोरपडे,संतोष भांड,दिपक चौधरी,प्रियंका चौधरी,रुपाली होन,शिवम तिवारी,सुनिता दळवी,राजश्री चाळक,वनिता लोंढे,मीना सातव,प्रशांत कर्पे,रोहिणी सूर्यवंशी,ज्ञानेश्वर मस्के,पांडुरंग वायखिंडे,दत्तात्रय भुसारी,अंशुमन गुप्ता यांचे मार्गदशन लाभले होते.
दरम्यान सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आत्मा मालिक माऊली यांच्या कृपाशीर्वादासह अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी,सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे,विश्वस्त प्रकाश भट,प्रकाश गिरमे,बाळासाहेब गोर्डे,प्रभाकर जमधडे,शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक सर,वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ आदींनी अभिनंदन केले आहे.