जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अर्थकारण

कोपरगाव तालुक्यातील…या पतसंस्थेला ८१ लाखांचा नफा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्था क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणा-या पद्मविभुषण डॉ.शरदचंद्र पवार नागरी सहकारी पतसंस्थेला २०२२-२३ या चालू आर्थिक वर्षात ८१ लाख १५ हजार निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष देवेन रोहमारे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

“संस्थेकडे भाग भांडवल ८३ लाख ६६ हजार ६७५ रुपये आहेत ३६ कोटी ५१ लाख २१ हजार रुपयांच्या ठेवी आहेत.संस्थेने ३१ मार्च २०२३ अखेर २६ कोटी,८४ लाख, ४३ हजार रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे.गुंतवणूक २२ कोटी ५९ लाख ४३ हजार इतकी असून राखीव निधी १० कोटी २२ लाख ३५ हजार आहे.सि.डी.रेशो ६२.८५ टक्के असून नेट एन.पी.ए.शून्य टक्के असून थकबाकी प्रमाण २.३९ टक्के राखले आहे”-देवेन रोहमारे,अध्यक्ष,पद्मविभुषण डॉ.शरदचंद्र पवार नागरी सहकारी पतसंस्था,गौतमनगर.

माजी खासदार कर्मवीर काळे यांनी सुरु केलेली हि पतसंस्था प्रगतीच्या शिखराकडे झेप घेत आहे.आज रोजी संस्थेकडे भाग भांडवल ८३ लाख ६६ हजार ६७५ रुपये आहेत ३६ कोटी ५१ लाख २१ हजार रुपयांच्या ठेवी आहेत.संस्थेने ३१ मार्च २०२३ अखेर २६ कोटी,८४ लाख, ४३ हजार रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे.गुंतवणूक २२ कोटी ५९ लाख ४३ हजार इतकी असून राखीव निधी १० कोटी २२ लाख ३५ हजार आहे.सि.डी.रेशो ६२.८५ टक्के असून नेट एन.पी.ए.शून्य टक्के असून थकबाकी प्रमाण २.३९ टक्के राखले असून संस्थेला सातत्याने ऑडीट वर्ग ‘अ’ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सदर संस्थेने आजपर्यंत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहातील कर्मचारी तसेच कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील छोटे-मोठे व्यावसायिकांना स्वत:चे छोटे-मोठे व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल उपलब्ध करून दिले असून सभासदांचे आणि कर्जदारांचे हित लक्षात घेवूनच संस्थेचे कर्मचारी काम करीत आहेत. व यापुढे देखील सर्व संचालक मंडळ माजी आ.अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली हि परंपरा यापुढेही अशीच सुरु ठेवणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष रोहमारे यांनी शेवटी सांगितले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close