अर्थकारण
…या मल्टीस्टेट सोसायटीच्या सोसायटीच्या विक्रमी १२१.७७ कोटींच्या ठेवी!
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील कार्यकर्ते व कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती उत्तमराव औताडे संस्थापक असलेल्या अजिंक्य औताडे मल्टीस्टेट कॉ-ऑप क्रेडिट सोसायटी ली.या वित्तीय संस्थेच्या गत वित्तीय वर्षात ठेवींचा व एकत्रित व्यवसायाचा १२१.७७ कोटींवर गेला असल्याची माहिती या संस्थेचे संस्थापक उत्तमराव औताडे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.संस्थेच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
“या आर्थिक वर्षात संस्थेने १५० कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे.संस्थेच्या या विकासात सभासद,ठेवीदार,संचालक मंडळ,अध्यक्ष,दैनिक ठेव प्रतिनिधी,कर्मचारी वर्ग आदींचे मोठे योगदान आहे या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो”-उत्तमराव औताडे,संस्थापक,अजिंक्य मल्टीस्टेट को-ऑप सोसायटी,कोपरगाव.
देशात कोरोना साथीने कहर उडवलेला असून जवळपास १ लाख ६५ हजाराहून अधिक नागरिक बळी गेले आहे.अद्याप दुसरा टप्पा सुरु असून याचा आवाका मोठा असून मृत्यूनोंद सर्वाधिक आहे.त्यामुळे जगांसह भारतात भीतीने नागरिकांना ग्रासले आहे.अशातच देशभर गतवर्षी टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती.त्यातून अनेक उद्योग,छोटे उद्योग,सहकारी,वित्तीय संस्था यांचे कंबरडे मोडले गेले आहे.मात्र तरीही काही वित्तीय संस्था यांनी समाजाच्या घटकांचा विश्वास संपादन केला आहे.त्यातील लक्षवेधी उदाहरण म्हुणून ग्रामीण भागात स्थापन होऊनही शहरी भागातील नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरलेल्या अजिंक्य मल्टीस्टेट कॉ.ऑप सोसायटीचे उदाहरण म्हणून प्रेरणादायी म्हटले पाहिजे.त्यांच्या गत वित्तीय वर्षात म्हणजेच सन-२०२०-२१ या वर्षात संस्थेच्या ठेवी ७१.७६ कोटी इतक्या झाल्या आहेत.संस्थेने उद्योजक,शेतकरी,लघुउद्योजक आदींना एकूण ५०.०१ कोटींचे कर्ज वाटप केला आहे.संस्थेच्या नेट एन.पी.ए.शून्य टक्के ठेवण्यात यश मिळवले आहे.या शिवाय संस्थेची २४.१० कोटींची सुरक्षित गुंतवणूक आहे.संस्थेला सन-२०२०-२१ या वित्तीय वर्षात ७८.४५ लाखांचा नफा झाला आहे.संस्थेची कोपरगाव येथे मुख्य शाखा असून शिर्डी,राहाता,व कोळपेवाडी आदी ठिकाणी शाखा आहेत.
या आर्थिक वर्षात संस्थेने १५० कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे.संस्थेच्या या विकासात सभासद,ठेवीदार,संचालक मंडळ,अध्यक्ष,दैनिक ठेव प्रतिनिधी,कर्मचारी वर्ग आदींचे मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गार संस्थापक उत्तमराव औताडे यांनी शेवटी काढले आहे.