जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपारंपरिक ऊर्जा विभाग

कोपरगाव पंचायत समिती छतावर सौर ऊर्जा सयंत्र बसवा-मागणी

जाहिरात-9423439946
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील नागरिकांच्या समस्या निर्मूलन अकरण्यात अग्रणी ठरलेल्या तहसील कार्यालय व पंचायत समितीवर इमारतीवर सौर प्रकल्प बसवा अशी मागणी नुकतीच श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेवून नुकतीच केली आहे.

“भारतातील वेधशाळांत अनेक दशकांपासून सूर्यप्रकाशाचा अवधी,सौर विकरण आणि दिशा यांच्या नोंदी केल्या गेल्या आहेत.त्यांचे विश्लेषण करून सौर प्रकल्पासाठी जागा ठरवली जाते.महाराष्ट्रात सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी भरपूर वाव आहे.सोलापूर,उस्मानाबाद आणि सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सौर ऊजचा वापर करणारे वीज निर्मिती प्रकल्प उभारले गेले आहेत.नागपूर,चंद्रपूर,लातूर, नगर,जळगाव,धुळे,पूणे आदी जिल्ह्यातही काही ठिकाणी असे प्रकल्प आहेत.नगर जिल्ह्यात ते वाढविण्याची गरज आहे”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष,साईबाबा संस्थान शिर्डी.

सौर ऊर्जेचा प्रकल्प भांडवली गुंतवणुकीचा विचार करता महाग पडतो.पण जास्त काळ टिकतो आणि तिचा दुरुस्ती खर्च कमी असतो.राष्ट्रीय सोलर मिशन अंतर्गत २०२२ पर्यंत २० हजार मेगावॅट वीज उत्पन्न व्हावी असा उद्देश आहे.सौर ऊर्जा उपयोगात आणण्यासाठी योजना आखताना सर्वप्रथम तिची उपलधता कुठे आणि किती आहे हे विचारात घ्यावे लागते.भारतातील वेधशाळांत अनेक दशकांपासून सूर्यप्रकाशाचा अवधी,सौर विकरण आणि दिशा यांच्या नोंदी केल्या गेल्या आहेत.त्यांचे विश्लेषण करून सौर प्रकल्पासाठी जागा ठरवली जाते.महाराष्ट्रात सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी भरपूर वाव आहे.सोलापूर,उस्मानाबाद आणि सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सौर ऊजचा वापर करणारे वीज निर्मिती प्रकल्प उभारले गेले आहेत.नागपूर,चंद्रपूर,लातूर, नगर,जळगाव,धुळे,पूणे आदी जिल्ह्यातही काही ठिकाणी असे प्रकल्प आहेत.या सर्व प्रकल्पांची एकूण वीज निर्मिती क्षमता ४०० मेगावॅट असली तर ती २०२० पर्यंत ती ७,५०० मेगावॅट इतकी वाढवायची योजना आहे.त्यामुळे कोपरगाव पंचायत समिती कार्यालयावर मोठी जागा असल्याने आ.काळे यांनी हि मागणी केली आहे.त्याला विशेष अर्थ असल्याचे मानले जात आहे.

या दोनही कार्यालयांना महिन्याकाठी मोठ्या स्वरुपात वीजबिल येते.दिवसेंदिवस या वीज बिलामध्ये वाढ होत आहे.त्यामुळे महसूल व ग्रामविकास विभागाचा वीज बिलापोटी मोठा आर्थिक खर्च होत आहे.
तहसीलदार कार्यालय व पंचायत समिती इमारतीवर सौर प्रकल्प बसविल्यास निश्चितच हा आर्थिक खर्च कमी होण्यास मदत होवून त्यातून वाचणारी रक्कम इतर सोयी सुविधांसाठी वापरली जाईल.यासाठी तहसील कार्यालय व पंचायत समितीवर इमारतीवर सौर प्रकल्प बसवावा अशी मागणी त्यांनी शेवटी मंत्री मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.याबाबत पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे आ.काळे यांनी शेवटी सांगितले आहे.

जाहिरात-9423439946

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close