जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

कंटेनरची दोन वाहनांना धडक,मोठे नुकसान,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

    कोपरगाव तालुक्यातील नगर-मनमाड राज्य मार्गावर असलेल्या पुणतांबा फाटा ते कोपरगाव शहराच्या दरम्यान उत्तर प्रदेशातील चालकाने आपल्या ताब्यातील कंटेनर (क्रं.आर.जे.१४ जी.पी.९७९६) हा मनमाडच्या दिशेने बेभानपणे चालवून एक मारुती स्विफ्ट डिझायरला (क्रं.एम.एच.०४ ई.टी.७८५७) जोराची धडक देऊन पुढे पुन्हा सदर कंटेनर जोरात चालवून एम.पी.सोसायटी नजिक उभ्या असलेल्या कान्हेगाव येथील ट्रॅक्टरला जोराची धडक देऊन मोठे नुकसान केल्या प्रकरणी यातील आरोपी ब्रम्हजित शिवसिंग कुंतल (वय-३६) याचे विरुध्द राहाता तालुक्यातील लोणी येथील फिर्यादी शांताराम नामदेव बागुल (वय-५४) यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

  

संकल्पित छायाचित्र.

सदर कंटेनरने मारुती स्विफ्ट डिझायर गाडीला जोराची धडक दिली आहे.त्यात त्यांचे मोठे नुकसान झाले असताना त्याने कोणताही बोध घेतला असल्याचे दिसले नाही.उलट सदर गुन्हा दाखल होण्यापासून वाचण्यासाठी त्याने पळून जात असताना त्याने पुन्हा साईबाबा कॉर्नर जवळ असलेल्या उभ्या ट्रॅक्टरला जोराची धडक देऊन मोठे नुकसान केले आहे.

   सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यात नगर मनमाड या मार्गाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे.रस्त्यावर आधीच खड्डे मावत नाही त्यामुळे अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.सावळीविहीर,पुणतांबा फाटा आणि कोपरगाव बेट येथील उड्डाणपूल भूतखाणे बनले आहे.त्याची वाहनधारकांना असून अडचण आणि नसून खोळंबा ठरत आहे.त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.परिणामी मोठ्या प्रमाणावर अपघात वाढले आहे.त्यातच काही चालक आपली जबाबदारी न ओळखता आपल्या ताब्यातील वाहन भरधाव चालवून अनेकांच्या जीवाशी खेळत आहे.परिणामी त्यात अनेक जणांचा हकनाक बळी जात आहे तर अनेक वाहनाचे नुकसान होत आहे.अशीच घटना काल दुपारी ४.१५ वाजेच्या सुमारास घडली आहे.यातील कंटेनर चालक ब्रम्हजित कुंतल हा बेभान होऊन आपल्या ताब्यातील वाहन चालवून त्याने पहिल्यांदा पुणतांबा फाटा येथील वरील क्रमांकाची व शांताराम बागुल यांचे मालकीची असलेले मारुती स्विफ्ट डिझायर गाडीला जोराची धडक दिली आहे.त्यात त्यांचे मोठे नुकसान झाले असताना त्याने कोणताही बोध घेतला असल्याचे दिसले नाही.उलट सदर गुन्हा दाखल होण्यापासून वाचण्यासाठी त्याने पळून जात असताना त्याने पुन्हा साईबाबा कॉर्नर जवळ असलेल्या नगरपरिषद मालकीच्या अग्नीशामक इमारतीजवळ उभ्या असलेल्या कान्हेगाव येथील शेतकरी सुधर्म बबनराव सांगळे यांच्या मालकीच्या,’ड्युटेक्स फहर’ या ट्रॅक्टरला (क्रं.एम.एच.३० ए .व्हि.५१०५) जोराची धडक दिली असून त्यात सदर ट्रॅक्टरच्या मागील टायर फोडून टाकले असून मोठे नुकसान केले आहे.

    या प्रकरणी यातील फिर्यादी शांताराम बागुल याचे फिर्यादी वरून कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.२३२/२०२५ भारतीय न्याय संहिता-२०२३ चे कलम २८१,३२४(४),साह मोटार वाहन कायदा अधिनियम कलम १३४(अ)(ब)१८४/१८७ प्रमाणे आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक भूषण हांडोरे यांनी भेट दिली आहे.तर पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.के.ए.जाधव हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close