जाहिरात-9423439946
अपघात

कोपरगाव तालुक्यात मोटार अपघात !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

घारी -(वार्ताहर)


   कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे शिवारात आनंदवाडी जवळ एका भरधाव क्रुझर गाडीने कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे ऊस तोडणी साठी चाललेल्या तोडणी कामगाराच्या बैलगाडीला जोराची धडक दिल्यामुळे ऊस तोडणी कामगार महिला व एक बैल गंभीर जखमी झाला असून क्रुझर गाडीचा चालक मात्र तेथून पसार झाल्याची माहिती पुरुष कामगार सुपडू बाबु जाधव याने आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

जखमी महिला उपचार घेताना छायाचित्रात दिसत आहे.

  

कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग एकमेकांना छेदून जात असून त्या ठिकाणी वाहनधारकांची अनेक वेळेला धांदल उडते त्यातच काही नागरिक “शॉर्टकट” मारण्याच्या नादात अपघाताला अनासाये निमंत्रण मिळत आहे.याकडे वाहतूक शाखेने लक्ष देणे गरजेचे बनले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,”सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्ग क्रं.१६० चे चौपदरीकरणाचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण असून बाजूचा पालखी मार्ग देखील अनेक ठिकाणी अपूर्ण आहे.या महामार्गावर वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत.अतिशय भरधाव वेगाने वाहने ह्या रस्त्यावर धावत असतात परंतु दिशादर्शक फलक योग्य ठिकाणी नसल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ उडते त्यामुळे अनेक वेळेस अपघात होतात तसेच झगडे फाटा या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग एकमेकांना छेदून जात असल्यामुळे त्या ठिकाणी वाहनधारकांची अनेक वेळेला धांदल उडते त्यातच काही नागरिक “शॉर्टकट” मारण्याच्या नादात अपघाताला अनायासे निमंत्रण मिळत आहे. याकडे वाहतूक शाखेने लक्ष देणे गरजेचे असताना मात्र येथे वाहतूक पोलीस उपस्थित नसल्याचे नागरिकांनी बोलून दाखवले आहे.


  नुकतीच दि.२५ रोजी संध्याकाळी ७.३० चे सुमारास आनंदवाडी या ठिकाणी साई दर्शनाला शिर्डी कडे जाणारी कार व चांदेकसारे येथील बाजार करून आपल्या घराकडे परतत असताना बाबासाहेब कारभारी माळी व नाना सोनवणे हे दोघे गंभीर जखमी झाले होते पुन्हा चारच दिवसात दुसरा अपघात झालेला आहे.या अपघातात सुपडू बाबु जाधव वय ४० वर्षे व त्याची पत्नी रणजुबाई सुपडू जाधव वय ३५ मुळ राहणार शिवापूर ता चाळीसगाव हे आपल्या बैलगाडीवर चांदेकसारे शिवारात ऊस तोडणी साठी दि.३० रोजी सकाळी जात असताना ६.३० च्या सुमारास पाठीमागून शिर्डी कडे जाणारी क्रुझर गाडी ने पाठीमागून धडक दिल्यामुळे महिला रणजुबाई व एक बैल गंभीर जखमी झाले आहेत. धडक देऊन वाहन चालक वाहन घेऊन पसार झाला आहे.


  दरम्यान ही घटना घडली तेव्हा गौतम सहकारी बॅंकेचे संचालक शरद होन तेथून सकाळी फिरायला जात असताना त्यांनी ताबडतोब काळे कारखान्याचे शेतकी अधिकारी कैलास कापसे यांना संपर्क करून घटनेची कल्पना दिली.त्यांनी आपले सहकारी उद्धव होन यांचे सह घटनास्थळी येऊन जखमींना डॉ.गोरक्षनाथ रोकडे यांचे दवाखान्यात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले.सदर प्रसंगी परशराम खरात सह आजूबाजूच्या ग्रामस्थांनी जखमींना मदत केली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close