जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

ट्रॅक्टर-दुचाकी अपघात,एक ठार,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे हद्दीत झगडेफाटा येथे आपल्या दुचाकीस (क्रं.एम.एच.१७ सी.ओ.८७६१) पेट्रोल भरण्यास जात असताना राहाता कचरा कुंडी नजीक रहिवासी असलेल्या इसम बाळू सुरेश माळी (वय-४५) यास समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने (एम.एच.४०सी.एम.९९८८) शिर्डी-सिन्नर रस्त्यावर जोराची धडक दिल्याने ते जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून या प्रकरणी मयताचा पुतण्या लहू सुरेश माळी (वय-२६) रा.चांदेकसारे यांनी गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

गुरुवार दि.२१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास चांदेकसारे हद्दीतील झगडे फाटा येथील चौफुलीवर असलेल्या पेट्रोल पंपावर इंधन टाकण्यास आपल्या वरील बजाज प्लॅटिना वरून जात असलेले राहाता येथील रहिवासी इसम बाळू माळी यांना समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने जोराची धडक दिली आहे.त्यात ते जागीच गतप्राण झाले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या नगर-मनमाड महामार्गावर दि.१५ सप्टेंबर रोजी दुपारी ०३ वाजेच्या सुमारास येवल्याकडे जाणारा एक राजस्थानचा ट्रक व बजाज सी.टी.१०० दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातातील तीन जण जागीच ठार झाले होते ते नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील रेंडाळे येथील निष्पन्न झाले असताना काल सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास चांदेकसारे हद्दीतील झगडे फाटा येथील चौफुलीवर असलेल्या पेट्रोल पंपावर इंधन टाकण्यास आपल्या वरील बजाज प्लॅटिना वरून जात असलेले राहाता येथील रहिवासी इसम बाळू माळी यांना समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने जोराची धडक दिली आहे.त्यात ते जागीच गतप्राण झाले आहे.

दरम्यान मयत इसम यांचा पुतण्या लहू माळी यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सदर ठिकाणी ग्रामस्थानीं घटनास्थळी धाव घेऊन जखमीस कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले असता उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांनी भेट दिली आहे.
              
दरम्यान या आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा अनुक्रमे क्रं.४५८/२०२३ भा.द.वि.कायदा कलम ३०४(अ)२७०,३३७,३३८,४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १९८८चे कलम १८४,१३४,(अ)(ब)१८७  प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाटेवाल करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close