दळणवळण
मोठ्या आर्थिक निधीमुळे रस्त्याचे जाळे निर्माण केले-..या नेत्याची माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदार संघातील जनतेने मतदान रुपी दिलेल्या आशीर्वादामुळे मतदार संघात रस्त्याचे जाळे निर्माण करू शकलो असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी रांजणगाव देशमुख येथे एका कार्यक्रम प्रसंगी केले.
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे जिल्हा वार्षिक योजना ३०५४ अंतर्गत ४० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या रांजणगाव देशमुख ते गोर्डे मळा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कामाचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी तहसीलदार संदीपकुमार भोसले,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण,सरपंच जिजाबाई मते,गजानन मते,जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे संचालक संतोष वर्पे,के.डी. खालकर,बहादरपुरचे सरपंच गोपीनाथ रहाणे,नंदकिशोरऔताडे,संपतराव खालकर,कैलास गव्हाणे,ज्ञानेश्वर गव्हाणे, आत्याभाऊ वर्पे,रावसाहेब कोल्हे,दशरथ खालकर,तान्हाजी खालकर,कौसर सय्यद,सिकंदर इनामदार,शिवाजीराव वामन,सुरेश गोर्डे,भाऊसाहेब गोर्डे,सचिन वामन,संदीप गोर्डे,अनिल वर्पे, रविंद्र गोर्डे,जीजाबापू गव्हाणे,निळवंडे पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता विवेक लव्हाट,पंचायत समिती गायकवाड,ठेकेदार चकोर आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”मतदार संघात रस्ते विकासाचा मोठा अनुशेष असल्यामुळे विकासाला मर्यादा येत होत्या.त्यामुळे रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे उद्दिष्ट् डोळ्यासमोर ठेवून रस्ते विकासाला मोठ्या प्रमाणात निधी मिळविण्यात यश आले आहे.खड्ड्याच्या रस्त्यांचा प्रवास करतांना झालेला त्रास सहन करणाऱ्या मतदार संघातील नागरिकांची रस्त्यांची मोठी अडचण दूर झाल्यामुळे बहुतांश रस्त्यांचा प्रवास सुखकर झाला आहे. रस्त्यांच्या जाळ्यामुळे अनेक गावे मुख्य रस्त्यांना जोडली जावून विकासाला चालना मिळाली असून यापुढील काळातही उर्वरित सर्वच रस्त्यांचा विकास करणार असल्याचे आ.काळे यांनी शेवटी सांगितले आहे.