जगावेगळे
‘ऋणानुबंधाच्या चुकून पडल्या भेटी’…भेटीत तिष्ठता मोठी…!
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंद विद्यालयातील सन-१९७६-७७ सालातील बॅचच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच शिर्डी येथील,’प्रेसिडेंट इन हॉटेल’ येथे हे स्नेहसंमेलन आयोजित केले होते.त्याला मोठा प्रतिसाद लाभला आहे.त्यासाठी माजी विद्यार्थी नरेंद्र कुर्लेकर,उमेश धुमाळ,प्रवीण डागा,राजेंद्र अजमेरे,शिला दरेकर,दिलीप अरगडे आदींनी पुढाकार घेतला आहे व पुन्हा एकदा बालपणात जाऊन पुन्हा एकदा शाळा अनुभवली असून.’ऋणानुबंधाच्या चुकून पडल्या भेटी…भेटीत तिष्ठता मोठी…! असा अलभ्य लाभ न झाला तर नवल !
शाळेतील मस्ती,एकत्रितपणे केलेला अभ्यास,शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक,शाळेतील क्रीडा स्पर्धा,शिक्षकांनी दिलेली शिक्षा,स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते.निमित्त होते कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंद विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे.
सदर प्रसंगी त्यांचे तत्कालीन शिक्षक परदेशी सर,लुंपाटकी सर,गुजराथी ताई,कालसीवाल सर,ए.एच.कुलकर्णी सर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.सदर प्रसंगी एकूण २५ मुली तर ५१ मुलांनी तथा माजी विद्यार्थ्यांनी देश-विदेशातून या उपक्रमास हजेरी लावली आहे.त्यातील एक विद्यार्थी तर थेट ऑस्ट्रेलियातून,’आपले बालपणीचे मित्र भेटणार’ या आनंदाने आपला अमूल्य वेळ काढून आला होता हे विशेष ! या जुन्या मित्रांच्या शालेय आठवणी म्हणजे,’ऋणानुबंधाच्या चुकून पडल्या भेटी…असा अनुभव न आला तर नवल !
सदर प्रसंगी उपस्थित वर्गमित्रांनी आपले अनुभव एकमेकास वाटून घेतले आहे.व आपल्या अपत्ये आणि आपण करत असलेली व्यवसाय आणि नोकरी आदी बाबत माहिती एकमेकास दिली आहे.व उर्वरित आयुष्यास शुभेच्छा दिल्या आहेत.या विद्यार्थ्यांनी बालपणात जाऊन पुन्हा एकदा शाळा अनुभवली आहे.”बालपण देगा देवा,मुंगी साखरेचा ठेवा” अशी मनीषा जागली नाही तर नवल !याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे व या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान सदर प्रसंगी उपस्थित शिक्षकांचा विद्यार्थ्यांनी शाल,श्रीफळ,सन्मान चिन्ह देऊन शिक्षकानांनी आपण कृतकृत्य झाल्याचा अनुभव आला आहे.यातील काही विद्यार्थी हे असाध्य आजाराने त्रस्त असून या उपक्रमाने त्यांना मोठी ऊर्जा मिळाली असल्याचे तत्कालीन विद्यार्थी उमेश धुमाळ यांनी आमच्या प्रतिनिधीस सांगितले आहे.