दळणवळण
…’त्या’ रस्त्याचे काम पूर्ण करा,कोपरगावात मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील नागरिकांना वाहतुकीसाठी व दळणवळणासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या कोपरगाव-धारणगाव रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा अशी मागणी कोपरगाव शहरातील जेष्ठ कार्यकर्ते उमेश धुमाळ यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचे कडे एक निवेदन देऊन केली आहे.
“काही महिन्यांपूर्वी कोपरगाव शहरातील कोपरगाव-धारणगाव या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.मात्र अद्याप या रस्त्याचे बाजूस पेव्हिंग ब्लॉक टाकणे गरजेचे आहे.माधव बाग ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसवणे गरजेचे आहे”-उमेश धुमाळ,जेष्ठ कार्यकर्ते,कोपरगाव.
काही महिन्यांपूर्वी कोपरगाव शहरातील कोपरगाव-धारणगाव या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.मात्र अद्याप या रस्त्याचे बाजूस पेव्हिंग ब्लॉक टाकणे गरजेचे आहे.माधव बाग ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसवणे गरजेचे आहे
दरम्यान या रस्त्यावर धारणगाव रोवरील एस.टी.बस स्थानकाच्या भिंतीलगत पथदिवे लावलेले नाही त्यामुळे सदर रस्ता रात्री अंधकारमय असतो असा त्यांनी दावा केला आहे.या शिवाय खुले नाट्यगृहाजवळच्या कोपऱ्यावर हायमॅक्स दिवा बसवावा,कोपरगाव बस स्थानकासमोर वैशाली स्कुटर समोर असलेले नगरपरिषदेचे अतिक्रमण काढून त्या ठिकाणी असलेल्या बस स्थानकाच्या भिंतीवर थोर महापुरुषांची चित्रे काढून त्यावर त्यांची माहिती द्यावी व विद्रुपीकरण रोखावे अशी मागणी शेवटी धुमाळ व अड्.नितीन पोळ यांनी शेवटी केली आहे.