दळणवळण
शिर्डी लोकसभा मतदार संघात विविध रस्त्यांसाठी ६३.५० कोटींचा निधी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा.सदाशिव लोखंडे यांच्या यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यांतील सोळा रस्त्यांना सुमारे ६३ कोटी ५० लक्ष रुपये मंजूर झाले असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजना ही १०० टक्के केंद्र पुरस्कृत योजना असून राज्यात सन-२००० पासून राबविण्यात येत आहे.सदर योजनेची अंमलबजावणी ग्रामविकास विभागाच्या आधिपत्याखालील महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत करण्यात येते.प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा मुख्य उद्देश हा सर्वसाधारण व बिगर आदिवासी भागातील १००० पेक्षा जास्त व आदिवासी भागातील ५०० पेक्षा जास्त लोकवस्तीची न जोडलेली गांवे बारमाही रस्त्यांद्वारे जोडणे हा आहे.
सध्या सदर योजनेअंतर्गत बिगर आदिवीसी भागात ५०० पेक्षा जास्त व आदिवासी भागातील २५० पेक्षा जास्त लोकवस्तीची न जोडलेली गावे बारमाही रस्त्यांव्दारे जोडण्याबाबतच्या प्रस्तावास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे.सदर योजने अंतर्गत खा.लोखंडे यांनी आपल्या मतदार संघातील विविध रस्त्यासाठी निधी मंजूर केला आहे.
त्यात शिर्डी लोकसभा मतदार संघातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा ते गुहा ते कोळसेवस्ती रस्त्यासाठी तीन कोटी ७५ लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत.चिंचोली ते तांभेरे गणेगाव-चिंचविहीरे-मोमीन आखाडा रस्त्यासाठी ०३ कोटी ७५ लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत.
अकोले तालुक्यातील राज्य मार्ग ३२ ते तांभोळ कुंभेफळ-कळस खुर्द ते राज्य मार्ग ५० या रस्त्यासाठी ०३ कोटी ७५ लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत.राज्यमार्ग ५० ते अंबड पाडाळणे शेलद रोड साठी तीन कोटी ७५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.समशेरपुर-कानडवाडी-गर्दनी-बहिरवाडी-मेहुदरी-शेरणखेल-कुंभारदरा-कुम्भाळणे-पोपरेवाडी-खिरवीरे रोड या रस्त्यासाठी तीन कोटी ७५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
याशिवाय कोपरगाव तालुक्यातील प्रतिमा ८४ पोहेगाव-देर्डे को-हाळे-देर्डे चांदवड ते कुंभारी रोड या रस्त्यासाठी तीन कोटी ७५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
दरम्यान नेवासा तालुक्यातील खुणेगाव ते भेंडा खुर्द रस्त्यासाठी तीन कोटी ७५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.शिरसगाव ते देशमुख वस्ती ते गोगलगाव रोड या रस्त्यासाठी तीन कोटी ७५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. राज्य मार्ग ५० सौंदाळा ते रांजणगाव रोड वस्ती ते नागपूर ते राज्य मार्ग ५० रोड या रस्त्यासाठी ०३ कोटी ७५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
राहता तालुक्यातील लोणी खुर्द,वेताळ बाबा चौक ते नेहरूनगर ते लोहगाव ते रा.मा.१६० या रस्त्यासाठी ०५ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत.प्र.जी.मा.११ ते रांजणगाव ते संभाजीनगर ते वाकडी ते तालुका हद्द या रस्त्यासाठी ०५ कोटी ५० लक्ष मंजूर झाले आहेत.
संगमनेर तालुक्यातील रा.मा.६० गुंजाळवाडी ते राजापूर ते निमगाव भोजापुर ते चिकणी ते वरपे वस्ती या रस्त्यासाठी ०३ कोटी ७५ लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत.जिल्हा हद्द-आशापुर बाबा ते चिंचोली गुरव ते नान्नज दुमाला ते बिरेवाडी ते सोनेवाडी मालदाड सुकेवाडी संगमनेर रोड या रस्त्यासाठी ०३ कोटी ७५ लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत.
रामा-३१ पिंपळे मालदाड-संगमनेर या रस्त्यासाठी ०३ कोटी ७५ लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत.शेडगाव मालुंजे,दिग्रस-रणखांबवाडी-दरेवाडी-कवठे मलकापूर ते म्हैसगाव रोड तालुका हद्द या रस्त्यासाठी ०३ कोटी ७५ लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे असे एकूण १३७.६५ किलोमीटर रस्त्यांसाठी ६३ कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत.
सदर मंजूर कामांना लवकरच प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे या कामांना मंजुरी मिळाल्यामुळे या सर्व तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.या रस्तेनिधींबद्दल बाळासाहेब शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांनी शिर्डीचे खा.सदाशिव लोखंडे यांचे आभार मानले आहे.