दळणवळण
कोपरगाव मार्गे सावळीविहिर-मनमाड…या अर्धवट रस्त्यास निधी मंजूर !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातुन जात असलेल्या जुन्या अ.नगर-मनमाड राज्यमार्ग सावळीविहिर पासून तोडण्यात येवून सावळीविहीर फाटा,कोपरगाव ते मनमाड या मार्गाला एन.एच.७५२ जी क्रमांक देण्यात आला आहे.या राष्ट्रीय महामार्गाच्या सावळीविहीर ते कोपरगाव पर्यंतच्या रस्त्याच्या कामास तातडीने सुरुवात करावी यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून या रस्त्याच्या १९१ कोटीच्या कामास प्रत्यक्षात प्रारंभ झाला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.मात्र यात लुंबिनी विहार ते साईबाबा चौफुलीवर काम करण्यास निधी उपलब्ध नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
“साईबाबा चौफुली ते येवला नाका या परिसरात अनेक अपघात होऊन अनेक जणांचे बळी गेले तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले मात्र दुर्दैवाने एवढा मोठा निधी मिळून देखील साईबाबा चौफुली करिता डांबरीकरणा शिवाय कोणतीही तरतूद नाही तसेच या पूर्वी एम.पी.सोसायटी पेट्रोल पंपाच्या जवळ अनेकदा मोठे खड्डे पडले होते या रस्त्याची वाहतूक व अपघाताचे प्रमाण पहाता भविष्यात हि समस्या कायम राहण्याची शक्यता असल्याने उर्वरित काँक्रिटीकरण रस्त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा”-अड्.नितीन पोळ,अध्यक्ष,लोक स्वराज्य आंदोलन.
कोपरगाव मतदार संघातील सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या जवळपास १३ कि.मी.मार्गावर लहान-मोठे खड्डे निर्माण झाल्यामुळे रस्त्याची चाळण होऊन लक्षणीय रित्या अपघातांची संख्या वाढली होती.सावळीविहीर फाटा,कोपरगाव ते मनमाड या मार्गाला एन.एच.७५२ जी क्रमांक देण्यात आला होता.या कामासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचेकडे या रस्त्यासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्यातून सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या रस्त्यासाठी १९१ कोटी निधी मंजूर करण्यात आला असून या रस्त्याच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे.
या १९१ कोटी निधीतून कोपरगाव गोदावरी नदीवर नवीन मोठा पूल बांधणे,पुणतांबा फाटा चौफुली व बेट नाका याठिकाणी पब्लिक अंडरपास (भुयारी मार्ग),राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम याठिकाणी पेड्स्टल अंडरपास (भूमिगत पादचारी मार्ग) तसेच भूमिगत चाऱ्यांचे ५ भुयारी मार्ग,८.५ किलोमीटरच्या भूमिगत गटारी करण्यात येणार आहे.या मार्गाची रुंदी एकूण १८ मीटर व दोन्ही बाजूने ३ मीटर साईडपट्टी असलेला या मार्गाचे पूर्णपणे काँक्रीटीकरण केले जाणार असून सावळीविहीर फाटा ते साईबाबा तपोभूमी जवळील लुंबिनी बुद्धविहारापर्यंत ९.५ किलोमीटरचा हा रस्ता होणार असून या रस्त्यासाठी १६१ कोटी खर्च येणार आहे.
यापुढे एस.एस.जी.एम.पर्यंत १ किलोमीटर रस्ता डांबरीकरण होणार असून या रस्त्यासाठी २.८६ कोटी खर्च येणार आहे.एकूण ९.५ कि.मी. रस्त्यासाठी एकूण १९१ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.उर्वरित निधीतून वीजवाहिन्या स्थलांतरीत करणे व अंडरपास जवळील भूमीअधिग्रहण करण्यासाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे.मात्र साईबाबा कॉर्नर चौफुली का सोडली आहे हे समजण्यास मार्ग नाही.
सदर काम कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून १८ महिन्याच्या कालावधीत या रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराला पूर्ण करावे लागणार आहे.त्यामुळे मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याला मुहूर्त लाभल्याने मतदार संघातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.