दळणवळण
कोपरगाव तालुक्यातील…या रस्त्याची अवस्था दयनीय,दुरुस्तीची मागणी
न्यूजसेवा
कुंभारी-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत ‘नंबर पाच’ हा रस्ता पूर्ण साधारण दीड किलोमीटरचा असून पूर्ण चिखल आणि दलदलमय झालेला आहे.याकडे सत्ताधारी नेत्यांचे लक्ष वेधूनही उपयोग झालेला नाही त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
वर्तमानात पावसाने जवळ पास पन्नास-साठ वर्षाचे उच्चांक मोडले आहे.त्यामुळे सर्वत्र पाऊस आणि पावसाची चर्चा सूरु आहे.शेतात पाणी,रस्त्यावर पाणी,रस्त्यात पाणी,गावात पाणी,गल्लीत पाणी,आणि पाणीच पाणी चोहीकडे अशी अवस्था आहे.त्यामुळे दळणवळणासाठी ग्रामीण भागात महत्वाचे ठरणारे रस्ते बिनकांमाचे व कुचकामी ठरले आहे.कुंभारी येथील रस्त्याची हि दुरावस्था छायाचित्रात दिसत आहे.
वर्तमानात पावसाने जवळ पास पन्नास-साठ वर्षाचे उच्चांक मोडले आहे.त्यामुळे सर्वत्र पाऊस आणि पावसाची चर्चा सूरु आहे.शेतात पाणी,रस्त्यावर पाणी,रस्त्यात पाणी,गावात पाणी,गल्लीत पाणी,आणि पाणीच पाणी चोहीकडे अशी अवस्था आहे.त्यामुळे दळणवळणासाठी ग्रामीण भागात महत्वाचे ठरणारे रस्ते बिनकांमाचे व कुचकामी ठरले आहे.त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील रस्त्याची दुरावस्था झाली आहे.
याबाबत वारंवार तालुक्यातील नेत्यांच्या कानावर घालून सुद्धा या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.या प्रकरणी आ.आशुतोष काळे यांनी लक्ष घालावे अशी मागणी येथील शेतकरी व ग्रामस्थ करत आहेत. दरवर्षी दीड किलोमीटर कुंभारी-कोळपेवाडी या रस्त्यावरील ग्रामस्थ व विद्यार्थी-विद्यार्थिनी शाळेत येण्या-जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.पावसाळ्यामध्ये मका,सोयाबीन खरीप,रब्बी पिके बाजारात आणताना अडचण तयार होत आहे.जर इथे कोणी ग्रामस्थ आजारी पडला त्यास बाहेर काढण्यास रुग्णवाहिका पोहचणे अवघड आहे अशी अवस्था या रस्त्याची झालेली आहे.सदर रस्ता त्वरित दुरुती करावा अशी मागणी येथील पंढरीनाथ घुले,सतीश घुले, संजय घुले,रमेश कदम,रमण कदम,भीमराज घुले,निवृत्ती घुले,अनिल घुले,अभीजित घुले आदींनी केलेली आहे.