कोपरगाव तालुका
गौतम बँकेच्या उपाध्यक्षपदी धोंडीराम वक्ते यांची निवड

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्रात नागरी सहकारी बँकांमध्ये अग्रगण्य असणा-या कोपरगाव तालुक्यातील गौतम सहकारी बँकेच्या उपाध्यक्षांची नुकतीच निवड संपन्न झाली असून या पदावर बँकेचे विद्यमान संचालक धोंडीराम दामू वक्ते यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.
बँकेच्या संचालक मंडळाची बैठक मुख्य कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली आहे. या बैठकीत उपाध्यक्ष पदासाठी मावळते उपाध्यक्ष राजेंद्र ढोमसे यांनी धोंडीराम वक्ते यांच्या नावाची सूचना मांडली. सदर सूचनेस संचालक साहेबलाल शेख यांनी अनुमोदन दिले व एकमताने धोंडीराम वक्ते यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष राजेंद्र ढोमसे यांनी आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिल्यामुळे उपाध्यक्ष पद रिक्त झाले होते.त्या रिक्त पदावर धोंडीराम वक्ते यांची निवड करण्यात आली आहे.त्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक मुख्य कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली आहे. या बैठकीत उपाध्यक्ष पदासाठी मावळते उपाध्यक्ष राजेंद्र ढोमसे यांनी धोंडीराम वक्ते यांच्या नावाची सूचना मांडली. सदर सूचनेस संचालक साहेबलाल शेख यांनी अनुमोदन दिले व एकमताने धोंडीराम वक्ते यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित उपाध्यक्ष धोंडीराम वक्ते यांचे बँकेचे मार्गदर्शक कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे, बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते यांनी अभिनंदन केले आहे.
उपाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल बोलतांना धोंडीराम वक्ते म्हणाले की, माजी खासदार स्व. कर्मवीर शंकरराव काळे यांनी कारखान्या बरोबरच स्थापन केलेल्या सर्वच सहकारी संस्था माजी आ.अशोक काळे यांनी सातत्याने प्रगतीपथावर ठेवून कारखाना परिसराचा विकास साधला. हि जबाबदारी आ.आशुतोष काळे यांनी आपल्या खांद्यावर घेवून यांचा कित्ता गिरवत गौतम सहकारी बँकेला आपल्या कुशल नेतृत्वातून प्रगतीच्या यशोशिखरावर घेवून जात आहेत.आज बँकेची परिस्थिती चांगली असून मोठ्या प्रमाणात ठेवीदार बँकेत ठेवी ठेवत आहेत.अशा आर्थिकदृष्ट्या भक्कम असलेल्या गौतम बँकेच्या उपाध्यक्ष पदावर काम करण्याच्या मिळालेल्या संधीतून बँकेच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करून आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते, बँकेचे मुख्य व्यवस्थापक बापूसाहेब घेमुड, व सर्व संचालक मंडळाच्या सदस्यांनी नवनिर्वाचित उपाध्यक्ष धोंडीराम वक्ते यांचे अभिनंदन केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ यांनी काम पहिले.