जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अवैध गोवंश वाहतूक,कोपरगावात आरोपीवर कारवाई

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भाजप सरकारने अवैध गोवंश हत्या व वाहतूक करण्यावर कायदेशीर बंदी केलेली असतानाही कोपरगाव तालुक्यातील भास्कर वस्ती समोर नगर-मनमाड रस्त्यावर महिंद्रा पिकअप (क्रं.एम.एच.२० ई.जी.८१५५) या वाहनातून अवैध ०३ गायी व ०७ वासरे वहातूक करताना येवला तालुक्यातील चिंचोडी येथील आरोपी शरद साहेबराव मढवई (वय-४०) याचे विरुद्ध कोपरगाव येथील फिर्यादी प्रकाश सुरेश नवाळी (वय-३६) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेवर येताच त्यांनी राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू केला होता.तरीही काही असामाजिक तत्वे हा कायदा पायदळी तुडवत आहे.मात्र काही कर्तव्यदक्ष कार्यकर्ते या बाबत सजग राहून अशा गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी करत आहे तर काही प्रकरणात थेट संबंधित वहाने पकडून देत आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहराच्या उत्तरेस साधारण सात कि.मी.अंतरावर असलेल्या येसगाव ग्रामपंचायत हद्दीत भास्कर वस्ती नजीक नगर-मनमाड रस्त्यावर घडली आहे.

सन-१९९५ साली युती सरकारच्या काळात गोवंश हत्या बंदी कायद्याचा मसुदा तयार करण्यात आले होता.मात्र,या विधेयकात काही त्रृटी होत्या.त्यामुळे त्यात सुधारणा करण्याची शिफारस केंद्राकडून करण्यात आली होती.परंतु,१५ वर्षांच्या काळात गोवंश हत्या बंदी कायद्यावर काही अभिप्राय सरकारने दिला नाही.मात्र महाराष्‍ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने गतवेळी सत्तेवर येताच यावर आपला अभिप्राय नोंदवला.याप्रकरणी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दखल घेऊन ०८ वर्षांपूर्वी गोवंश हत्या बंदी कायद्यावर स्वाक्षरी केली होती.त्यानंतर हा कायदा राज्यात लागू करण्यात आला असतानाही काही आरोपी या बाबत गुन्हे करत असल्याचे वारंवार लक्षात येत आहे.त्यामुळे काही कर्तव्यदक्ष कार्यकर्ते या बाबत सजग राहून अशा गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी करत आहे तर काही प्रकरणात थेट संबंधित वहाने पकडून देत आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहराच्या उत्तरेस साधारण सात कि.मी.अंतरावर असलेल्या येसगाव ग्रामपंचायत हद्दीत भास्कर वस्ती नजीक नगर-मनमाड रस्त्यावर घडली आहे.

त्या बाबत फिर्यादिस काही गुप्त खबरी नुसार सदर रस्त्यावर काही असामाजिक तत्व पिकअप वाहनाच्या सहाय्याने काही गायी व वासरे यांना आपल्या वाहनात बेकायदा कोंबून वाहून नेत असल्याची खबर प्राप्त झाली होती.त्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी लक्ष ठेवले असता सदर वाहन आढळून आले आहे.त्यांनी याबाबत तालुका पोलीस ठाण्यास खबर दिली होती.दरम्यान ती खरी निघाली होती.त्यानुसार पोलिसांनी आपल्या सहकांऱ्यासह सापळा लावला होता.

दरम्यान त्यात २.५० लाख रुपये किमतीचा वरील क्रमांकाचा पांढऱ्या रगांचा महिंद्रा पिकअप वाहन,१५ हजार रुपये किमतीची काळ्या पांढऱ्या रंगाची लहान शिंगे असलेली पाच वर्ष वय असलेली कालवड,१५ हजार रुपये किमतीची काळ्या पांढऱ्या रंगाची सहा इंच शिंगे असलेली गावरान गाय,१५ हजार रुपये किमतीची काळे रंगाची पाठीवर पांढरे पट्टे असलेली कालवड,यासह प्रत्येकी ०५ हजार रुपये किमतीच्या विविध रंगाच्या दहा महिने ते एक वर्ष वय असलेल्या ०७ कालवडी असा एकूण ०३ लाख ३० हजार रूपये किमतीचा अवैज पोलिसांनी जप्त केला आहे.दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व सहाय्यक फौजदार आंधळे यांनी भेट दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.६४/२०२३ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अधिनियम १९९५चे सुधारित कलम ५ (अ)सह ९ तसेच प्राण्यांना वागविण्यात प्रतिबंध कायदा कलम ३ व ११ प्रमाणे वरील आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ए.एम.आंधळे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close