जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

कोपरगाव शहरातील प्रमुख रस्ते प्रशासन कधी करणार?-माजी नगराध्यक्षांचा सवाल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील जास्त दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा संभाजी महाराज पुतळा ते गोकुळनगरी ते टाकळी नाका येथून सुरु होणारा इंदीरा पथ या चाळणी झालेल्या खड्डेमय धुळयुक्त रस्त्याचे काम कधी सुरू करणार असा तिखट सवाल माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनास विचारला आहे.

“कोपरगाव मध्ये प्रवेशासाठी महत्वाचा ठरणारा रोड,”बेट नाका ते तांडेल बंगला” ते “सोमय्या कॉलेज गेट ते मौंनगिरी” ( छोटा पूल ) या रस्त्याला खूप मोठे खड्डे पडले आहेत.महाविद्यालयात येता जाताना विद्यार्थाना व नागरिकांना खूप त्रास होत आहे असल्याचा आरोप करुन रस्त्यांची कामे केवळ वर्षाखेरीस बिले काढण्यासाठी न करता ते उच्च दर्जाचे झाले पाहिजे याबाबत पालिकेचा इतिहास चांगला नाही”-मंगेश पाटील,माजी नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव नगरपरिषदेची गत निवडणूक संपन्न झाल्यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या काळात विकास कामांच्या कोनशिला लागू नये यासाठी ईशान्य गडावरील नेत्यांनी आकाश पाताळ एक करुन सोडले होते.त्या साठी नाना क्लुप्त्या केल्या होत्या.शेवटी तर मंजूर झालेले शहरातील अठ्ठावीस रस्त्यांचे काम होऊ नये यासाठी उच्च न्यायालयाचा दरवाजा खटवण्यात आला होता.मात्र या खोड्यामुळे जनतेत पसरणारा रोष पाहून आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीत ‘त्या’ दगडाखाली आपलेच बोटे अडकतील हि साधार भीती वाटू लागल्याने व आपले “काळहरण” पर्व संपल्यावर या कामास हिरवा कंदिल दिला होता.त्यांनी तत्कालीन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या शब्दाचा कांगावा करत त्यातून पळ काढावा लागण्याची नामुष्की पत्करावी लागली होती.त्यामुळे कामे मंजुर होऊनही ‘ती’ नगराध्यक्ष वहाडणे यांना त्यांच्या कालखंडात पूर्ण करता आली नाही हे बऱ्याच अंशी वास्तव.आता कामे सुरु असली तरी काही कामाचा दर्जा सुमार असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढत चालल्या आहे हि चिंतेची बाब आहे.अशीच घटना माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या बाबतीत घडली असून त्यांनी या प्रलंबित कामांचा तगादा नगरपरिषद प्रशासनाकडे लावला आहे.त्यात “पंचायत समिती इमारत,ठोळे निवास ते आठरे बंगला हा रस्ता”,आहे त्यावर खूप खड्डे पडले असून फक्त तहसील कार्यालयापर्यंत हा रस्ता केला असून पूढील रस्ता अर्धवट सोडून दिला आहे.कोणताच रस्ता व्यवस्थित करत नसल्याचा राग आळवला आहे.

त्याच बरोबर कोपरगाव मध्ये प्रवेशासाठी महत्वाचा ठरणारा रोड,”बेट नाका ते तांडेल बंगला” ते “सोमय्या कॉलेज गेट ते मौंनगिरी” ( छोटा पूल ) या रस्त्याला खूप मोठे खड्डे पडले आहेत.महाविद्यालयात येता जाताना विद्यार्थाना व नागरिकांना खूप त्रास होत आहे असल्याचा आरोप केला आहे.
रस्त्यांची कामे केवळ वर्षाखेरीस बिले काढण्यासाठी न करता ते उच्च दर्जाचे झाले पाहिजे अशी त्यांची मागणी आहे.वर्तमानात नगरपालिकेची मुदत संपली असून कोणाला बोलावे हाच प्रश्न सर्वांना पडला आहे.
खूप वर्षांपासून जनता या खड्ड्याचा व धुळीचा त्रास सहन करीत आहे.निधी आहेत याचा उपयोग नगरपालिका प्रशासनाने यात लक्ष घालून कामाचे वेग वाढवून उच्च दर्जाचे काम करून घेऊन जनतेला होणाऱ्या त्रासातून सुटका करावी असे आवाहन माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close