दळणवळण
दुचाकी,चारचाकी वाहनांसाठी नवीन क्रमांकाची मालिका,पसंती क्रमांकासाठी करा अर्ज आवाहन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेतर (खाजगी) संवर्गातील चारचाकी एम.एच.१७ सी.आर.आणि दुचाकी वाहनांसाठी एम.एच.१७ सि.एस. ही नवीन मालिका सुरु करण्यात आली आहे.आकर्षक व पसंतीचा क्रमांक मिळण्यासाठी पुढीलप्रमाणे पध्दत अवलंबण्यात येणार आहे.इच्छुकांनी सम्बधित कार्यालयात संपर्क साधून आपला आवडीचा प्रामाणीक निवडून घ्यावा असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे यांनी केले आहे.
चारचाकी परिवहनेतर (खाजगी) वाहनांच्या आकर्षक क्रमांकासाठी परिवहनेतर चारचाकी वाहन मालिकेतील शुल्कातील तीनपट शुल्क भरुन सी.एस.या मालिकेतील आकर्षक क्रमांक आरक्षित करता येईल.सदर मालिकेतील एकाच क्रमांकासाठी दुचाकी वाहन व चारचाकी वाहन यासाठी अर्ज प्राप्त झाल्यास सदर क्रमांकासाठी दुचाकी अर्जदार (दुचाकी वाहनांसाठीचे शासकीय शुल्क अधिक लिलावासाठी प्राप्त अतिरिक्त धनादेशाची रक्कम) व चार चाकी अर्जदार (चार चाकी वाहनांसाठीचे शासकीय शुल्क अधिक लिलावासाठी प्राप्त अतिरिक्त धनादेशाची रक्कम) यापैकी ज्या अर्जदाराची जास्त असेल अशा अर्जदारास तो क्रमांक देण्यात येईल”गणेश डगळे,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,श्रीरामपूर.
इच्छुक अर्जदारांनी दिनांक ३० डिसेंबर रोजी सकाळी १०.३०ते दुपारी ०४-३० वाजेपर्यंत पसंती क्रमांकाच्या विहीत शुल्काचा डिमांड ड्राफ्टसह अर्ज कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभाग खिडकी क्रमांक १५ येथे जमा करावेत. वाहन ज्याच्या नावावर असेल त्या व्यक्तीच्या नावाच्या अर्जासोबत त्यांचा पत्त्याचा पुरावा,पॅन कार्ड,(फोटो आयडी-भ्रमणध्वनी क्रमांक व ईमेलसह) साक्षांकित जोडावा.उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,श्रीरामपूर (Dy.RTO,Shriramapur) या नावाने पसंती क्रमांक शुल्काचा डिमांड ड्राफ्ट कोणत्याही राष्ट्रीयकृत अथवा शेडुल्ड बँकेचा असावा.एकदा राखून ठेवलेला पसंती क्रमांक दुसऱ्या व्यक्तीच्या अथवा संस्थेच्या नावाने हस्तांतरीत करण्यात येणार नाही तसेच रद्द करता येणार नाही.
एकाच पसंतीक्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आले तर त्या पसंती क्रमांकाची यादी 30 डिसेंबर २०२१ रोजी ५.३० वाजता प्रदर्शित करण्यात येईल.पसंती क्रमांकासाठी ज्यांनी अर्ज केला आहे अशा दुचाकी अर्जदारांनी ३१ डिसेंबर,२०२१ रोजी दुपारी ०३.३० वाजता आणि चारचाकी वाहनांसाठी दुपारी ०४-०० वाजता सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे दालनात हजर रहावे.आकर्षक क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्जदारांनी सदरच्या क्रमांकासाठी पसंती क्रमांक शुल्काच्या डिमांड व्यतिरिक्त जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात घेऊन यावा. त्यानंतर सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अथवा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे दालनात अर्जदारांसमक्ष लिफाफे उघडण्यात येतील.ज्या अर्जदाराचा धनादेश जास्त रकमेचा असेल त्या अर्जदारास विशिष्ट आकर्षक क्रमांक बहाल करण्यात येईल.
चारचाकी परिवहनेतर (खाजगी) वाहनांच्या आकर्षक क्रमांकासाठी परिवहनेतर चारचाकी वाहन मालिकेतील शुल्कातील तीनपट शुल्क भरुन सी.एस.या मालिकेतील आकर्षक क्रमांक आरक्षित करता येईल.सदर मालिकेतील एकाच क्रमांकासाठी दुचाकी वाहन व चारचाकी वाहन यासाठी अर्ज प्राप्त झाल्यास सदर क्रमांकासाठी दुचाकी अर्जदार (दुचाकी वाहनांसाठीचे शासकीय शुल्क अधिक लिलावासाठी प्राप्त अतिरिक्त धनादेशाची रक्कम) व चार चाकी अर्जदार (चार चाकी वाहनांसाठीचे शासकीय शुल्क अधिक लिलावासाठी प्राप्त अतिरिक्त धनादेशाची रक्कम) यापैकी ज्या अर्जदाराची जास्त असेल अशा अर्जदारास तो क्रमांक देण्यात येईल.यासंदर्भात विहित शुल्काची माहिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर तसेच खिडकी क्रमांक ३१ वर प्रदर्शित करण्यात आली आहे. इच्छूकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.