दळणवळण
कोरोनाचा विकास कामांवर प्रतिकूल परिणाम होणार नाही-आश्वासन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात कोरोना साथीचा विकास कामांवर प्रतिकूल परिणाम कोरोना साथीचा संपूर्ण जगावर आर्थिक परिणाम झाला आहे.राज्यातही तो झाला असून विकास निधीत मोठी घट झाली असली तरी पण विकास कामांवर प्रतिकूल परिणाम होऊ देणार नाही असे आश्वासन आ.आशुतोष काळे यांनी तीळवणी येथील एका कार्यक्रमात बोलताना दिले आहे.
“कोरोना संकटामुळे राज्याचे उत्पन्न कमी झाल्यामुळे निधी कमी मिळाला असला तरी मिळणाऱ्या निधीतून दर्जेदार विकासकामे करण्यावर भर देत आहे.कोरोनाचे संकट नसते तर मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असता.सत्ताधारी पक्षाचा आमदार असतांना किती निधी मिळतो हे मतदार संघातील जनतेला दाखवून दिले असते”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव विधानसभा मतदार संघ.
कोपरगाव तालुक्यातील तिळवणी येथे सन २०२०-२१ जिल्हा नियोजन योजनेअंतर्गत २१.७३ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या तिळवणी ते येवला हद्द व सावळगाव येथे २१.७३ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या सावळगाव ते ओगदी रस्त्याच्या डांबरीकरण व मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले त्या वेळी ते बोलत होते.
यावेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक बाळासाहेब बारहाते,कारभारी आगवन,राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,सांडूभाई पठाण,राहुल जगधने,सरपंच गोविंद पगारे,उपसरपंच जयश्रीताई गायके,नाना गायके,अशोक वाघ,संदीप शिंदे,चंद्रकांत गायके,पोपट शिंदे,पुंडलिक चक्के,भाऊसाहेब शिंदे,गणेश कुऱ्हाडे, सुदाम उकिरडे, सार्वजनिक बांधकाम अभियंता प्रशांत वाकचौरे,ग्रामसेवक योगेश देशमुख आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”कोरोना संकटामुळे राज्याचे उत्पन्न कमी झाल्यामुळे निधी कमी मिळाला असला तरी मिळणाऱ्या निधीतून दर्जेदार विकासकामे करण्यावर भर देत आहे.कोरोनाचे संकट नसते तर मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असता.सत्ताधारी पक्षाचा आमदार असतांना किती निधी मिळतो हे मतदार संघातील जनतेला दाखवून दिले असते.निधी कमी मिळत असल्यामुळे माझे पण समाधान होत नाही त्यासाठी सातत्याने मतदार संघाच्या विकासासाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असून त्या प्रयत्नातून विकासाचा अनुशेष नक्की भरून निघेल असा आशावाद आ.काळे यांनी व्यक्त केला.या वेळी तिळवणीचे नवनिर्वाचित सरपंच गोविंद पगारे व उपसरपंच नानासाहेब गायके यांचा आ.काळे यांनी सत्कार केला.