दळणवळण
कोपरगाव तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार-आ.काळे
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील जनतेने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या सर्वच खात्यांचे सहकार्य मिळत आहे. मिळालेल्या सहकार्यातून मतदार संघाच्या विकासाला देण्यात यशस्वी होत असून जनतेचा प्रतिनिधी या नात्याने महाविकास आघाडी सरकारच्या सहकार्याने नागरिकांना अपेक्षित असलेली विकासकामे पूर्ण करू असे आश्वासनआ.आशुतोष काळे यांनी मायगाव देवी येथील एका कार्यक्रमात दिले आहे.
“मतदार संघाच्या विकासाला चालना देण्यासाठी अनेक विकासकामांचे प्रस्ताव शासनदरबारी सादर केले.त्यापैकी अनेक प्रस्तावांना मंजुरी मिळाल्या काही प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत.ते प्रस्ताव देखील मंजूर होतील”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव विधानसभा.
कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथे आ.काळे यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत १६ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या मायगाव देवी ते धामोरी रस्ता खडीकरण,तांबोळीनाला दुरुस्ती व मुरुमीकरण आणि मायगाव देवी ते झेड कॉर्नर रस्ता मुरुमीकरण कामाचे तसेच मायगाव देवी ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकासकामांचे भूमीपूजन आ.काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक ज्ञानदेव मांजरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,पंचायत समिती सदस्य अनिल कदम,श्रीकृष्ण गाडे,प्रभाकर गाडे,साहेबराव गाडे,अनंतराव गाडे,धोंडीराम गाडे,नामदेव साबळे,बाबासाहेब गाडे,गिरीश गाडे,मोतीराम मोकळ,पुंडलिक माळी,भगवान माळी,चैतन्य कुलकर्णी,राहुल जगधने,भारत भुसारे,बापू गाडे,अशोक भगत,बापू जाधव,सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”मतदार संघाच्या विकासाला चालना देण्यासाठी अनेक विकासकामांचे प्रस्ताव शासनदरबारी सादर केले.त्यापैकी अनेक प्रस्तावांना मंजुरी मिळाल्या काही प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत.ते प्रस्ताव देखील मंजूर होतील.मंजूर प्रस्तावातून रस्त्यांची कामे मार्गी लागून अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु झाली आहेत काही रस्त्यांची देखील लवकरच कामे सुरु होतील.कोरोना संकटामुळे आर्थिक अडचण आहे मात्र मतदार संघाच्या विकासासाठी जेथून निधी उपलब्ध होईल तेथून निधी मिळविण्यासाठी माझे प्रयत्न सुरु आहे.मतदार संघासाठी जास्तीत जास्त निधी आणून मतदार संघाचा विकासाचा अनुशेष भरून काढणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.