जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

धनगरवाडीनजीक रेल्वेतुन पडून सैनिकांचा मृत्यू,घात की अपघात चर्चेला उधाण

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

वाकडी-(प्रतिनिधी)

राहाता तालुक्यातील धनगरवाडी शिवारात रेल्वे मार्ग नजीक शनिवार दि १३ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास एका ४५ ते ५० वय असलेला इसम मृत अवस्थेत आढळून आला असून पोलीस चौकशीत ते पंजाब येथील मूळ रहिवाशी असून ते पुणे विभागात सैनिक पदावर काम करता असल्याची माहिती उपलब्ध झाल्याने खळबळ उडाली असून हा घात की अपघात या चर्चेला वाकडी,धनगरवाडी परिसरात उधाण आले आहे.

राहाता तालुक्याच्या पूर्व भागातून वाकडी ग्रामपंचायत हद्दीत धनगरवाडी छोटेसे गाव असून नुकतीच स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाली आहे.या गावाच्या हद्दीतून नगर-दौन्ड हा रेल्वे मार्ग जातो.आता तो दुहेरी मार्ग झाला आहे.व त्याचे विद्युतीकरण केले आहे.या मार्गावर धनगरवाडी शिवारात एका ज्ञात इसमाचा मृतदेह रेल्वे रुळानजीक काही ग्रामस्थांना आढळला होता त्यामुळे हि घटना उघड झाली आहे.

राहाता तालुक्याच्या पूर्व भागातून वाकडी ग्रामपंचायत हद्दीत धनगरवाडी छोटेसे गाव असून नुकतीच स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाली आहे.या गावाच्या हद्दीतून नगर-दौन्ड हा रेल्वे मार्ग जातो.आता तो दुहेरी मार्ग झाला आहे.व त्याचे विद्युतीकरण केले आहे.या मार्गावर धनगरवाडी शिवारात एका ज्ञात इसमाचा मृतदेह रेल्वे रुळानजीक काही ग्रामस्थांना आढळला होता.याची माहिती त्यांनी श्रीरामपूर पोलिसांना कळवले असता श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मसूद खान पो.कॉ.अशोक अढांगळे यांच्या सह पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले.त्यांनी सदरील इसमाचा मृतदेह पंचनामा करत असताना तो संतोष सिंग नामक इसम सैनिक असल्याचे उपलब्ध कागदपत्रातून उघड झाले असून ते पुणे विभागात कार्यरत असून पंजाब येथील मूळ रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे.पोलिसानी तत्काळ संतोष सिंग यांच्या फोन नंबरवर फोन केला असता ते प्रवास करत असलेल्या पुणे पंजाब गाडीतील शेजारी बसलेल्या प्रवाशांनी सिंग यांचा फोन उचलला. सिंग यांची बॅग व मोबाईल रेल्वे गाडीतच असल्याचे स्पष्ट झाले तसेच संतोष सिंग हे धनगरवाडी भागात रेल्वे मार्गाच्या कडेला असलेल्या पोलला आदळून पडून जबर मार लागून जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.मात्र संतोष सिंग हे रेल्वे गाडीतून पडले की अन्य काही कारण असू शकते हे मात्र पोलीस तपासात समजेल.सदर घटनेची माहिती श्रीरामपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे अशोक अढांगळे यांनी संतोष सिंग यांच्या नातेवाईकांना दिली.रात्री उशिरा शवविच्छेदन झाल्यावर पुणे येथील सैन्यदल अधिकारी व कर्मचारी यांनी संतोष सिंग यांचा मृतदेह सन्मानपूर्वक पंजाब येथे विमानाने पोहचविण्याची प्रक्रिया पूर्ण केली.संतोष सिंग यांच्या मृत्यूचा तपास श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन कडून रेल्वे पोलिसांकडे वर्ग झाल्यावर संतोष सिंग यांच्या मृत्यू बाबत पुढील तपास होणार आहे.संतोष सिंग या सैनिकाच्या संशयास्पद मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close