दळणवळण
कोपरगाव तालुक्यात विविध रस्त्यांचा शुभारंभ
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आ. आशुतोष काळे यांनी केलेल्या प्रयत्नातून या रस्त्यांसाठी निधी प्राप्त झाला असून या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ नुकताच त्यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
कोपरगाव तालुक्यात रस्त्यांचा कामाचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे.त्यात राष्ट्रीय महामार्ग,राज्य मार्ग,जिल्हा मार्ग आदींचा समावेश आहे.या रस्त्यांना मोठा निधी आवश्यक आहे.रस्त्या च्या दुरावस्थानमुळे तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे त्यात अनेकांची जीवित व वित्तीय हानी झाली आहे.या पूर्वी निव्वळ घोषणाबाजीचा सुकाळ होता.आता यात सुधारणा होण्याची ग्रामस्थांना माफक अपेक्षा आहे.
कोपरगाव तालुक्यातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. नागरिकांना
कोपरगाव तालुक्यात रस्त्यांचा कामाचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे.त्यात राष्ट्रीय महामार्ग,राज्य मार्ग,जिल्हा मार्ग आदींचा समावेश आहे.या रस्त्यांना मोठा निधी आवश्यक आहे.रस्त्या च्या दुरावस्थानमुळे तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे त्यात अनेकांची जीवित व वित्तीय हानी झाली आहे.या पूर्वी निव्वळ घोषणाबाजीचा सुकाळ होता.आता यात सुधारणा होण्याची ग्रामस्थांना माफक अपेक्षा आहे.
कोपरगाव तालुक्यातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत होता याची दखल घेवून या रस्त्यांसाठी निधी मिळविण्यासाठी आ. काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी निधी प्राप्त झाला आहे.या रस्त्यांच्या कामांस प्रारंभ करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
यामध्ये आ.काळे यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत १० लक्ष निधीतून मल्हारवाडी ते कोऱ्हाळे हद्द रस्त्याचे खडीकरण,तसेच स्थानिक विकास निधीअंतर्गत १० लक्ष निधीतून शहाजापूर बस स्थानक ते कोळगाव शिव रस्त्याचे खडीकरण व देर्डे चांदवड येथे सन २०२०-२१ जिल्हा नियोजन योजनेअंतर्गत २५ लक्ष निधीतून देर्डे चांदवड ते डाऊच बु. रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण आदी कामांचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व रस्त्यांची कामे चांगल्या दर्जाची करावी व ग्रामस्थांनी देखील चांगल्या गुणवत्तेचे रस्ते होतील याकडे लक्ष द्यावे अशा सूचना दिल्या.
यावेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक सुनील शिंदे,आनंदराव चव्हाण,सूर्यभान कोळपे,रोहिदास होन,राहुल रोहमारे,राहुल जगधने, प्रभाकर गुंजाळ,पोलीस पाटील बाबासाहेब गुंजाळ,बाबासाहेब गुंजाळ, रावसाहेब कोल्हे, युवराज गांगवे,साहेबराव कांडेकर कचरू कांडेकर, गोकुळ कांडेकर,आप्पासाहेब शिंदे,अनिल गुंजाळ,ज्ञानेश्वर गव्हाणे,गोपीनाथ रहाणे,शांतीलाल पवार,किरण पवार,राहुल जगधने,सरपंच योगिराज देशमुख,तुकाराम होन,प्रीतम मेहेत्रे,कृष्णा शिलेदार,पोपटराव कोल्हे,बाबासाहेब देशमुख,ज्ञानदेव होन,चांगदेव होन,पोपटराव गुंड,बबनराव होन,धर्मा दहे,गुलाबराव कोल्हे,जयंत शिलेदार,सागर होन,संतोष डुबे,पंडित होन,बबनराव शिलेदार,प्रविण टिळेकर, महेश माळी,सोमनाथ भवर,समीर वर्पे,गौतम बँकेचे संचालक राजेंद्र ढोमसे,माजी संचालक सिकंदर पटेल,सरपंच सचिन वाबळे,उपसरपंच बाळासाहेब ढोमसे सर्व सदस्य भाऊसाहेब वाबळे,शिवाजी वर्पे,राहुल जगधने,आंबदास कदम,किरण चंद्रे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशांत वाकचौरे,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,उपअभियंता उत्तम पवार,ग्रामसेवक सुरेश रहाणे, ग्रामसेविका श्रीमती आरती टोरपे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.