निधन वार्ता
ढोबळे यांना मातृशोक

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील कार्यकर्ते विश्व हिंदु परिषदेचे प्रखंड अध्यक्ष रविकिरण ढोबळे यांच्या मातोश्री मालनबाई शंकरराव ढोबळे यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात चार मुले,दोन मुली असा परिवार आहे.त्यांच्यावर गोदावरीतीरी अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

स्व.मालनबाई ढोबळे या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून प्रसिद्ध होत्या.त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत घराची धुरा सांभाळली होती.त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.
स्व.मालनबाई ढोबळे या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून प्रसिद्ध होत्या.त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत घराची धुरा सांभाळली आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.त्यांच्या निधनाने कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे,सोशल मीडिया सेलचे विभागीय अध्यक्ष समोर आंबोरे,भाजपचे माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड,प्रभाकर वाणी,प्रमोद पाटील सर,योगेश वाणी आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.