दळणवळण
निकृष्ट रस्ता कामे करणाऱ्या ठेकदारांवर करणार कारवाई-..इशारा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजेनेतील रखडलेली रस्त्यांची कामे नुकतीच सुरू करण्यात आली आहे.त्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी समाधान व्यक्त केले असले तरी निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकदारांवर कारवाई करणार असल्याचा इशारा मात्र दिला आहे.

कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करून प्रथमच तालुक्यातील रस्त्यांची कामे निकृष्ट होत असल्याची जाहीर कबुली दिली आहे.त्याबद्दल त्यांचे अभिनंदन ! अलिकडे नेत्यांमध्ये अशी प्रामाणिकपणाची भूमिका अभावाने आढळून येते.त्यांच्यात अलिकडे आम्ही करतो तेच खरे आणि सत्य अशी मुजोरी वाढताना दिसत आहे.त्यावर ही काय तेवढी समाधानाची बाब.
कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांची पार वाट लागली आहे.त्यामुळे अनेकांचे हकनाक बळी जात आहे.वाहनधारकांचे मोठे नुकसान होत आहे.वाहनधारक किती जायबंदी होतात याची मोजदाद नाही.त्यामुळे प्रवासी आणि वाहतूकदारांत संताप व्यक्त होत आहे.यात अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचा टक्का असल्याचे बोलले जात आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करून प्रथमच तालुक्यातील रस्त्यांची कामे निकृष्ट होत असल्याची जाहीर कबुली दिली आहे.त्याबद्दल त्यांचे अभिनंदन ! अलिकडे नेत्यांमध्ये अशी प्रामाणिकपणाची भूमिका अभावाने आढळून येते.त्यांच्यात अलिकडे आम्ही करतो तेच खरे आणि सत्य अशी मुजोरी वाढताना दिसत आहे.त्यांनी याआधीही शहरातील वाढलेली गुन्हेगारीबाबत जाहीर कबुली देऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन लक्ष वेधून घेतले त्याला फार दिवस झाले नाही.कोपरगाव नगरपरिषद निवडणूक ही घटना आहे.अशाच आता त्यांनी ठेकेदारांकडे वक्रदृष्टी केल्याचे जाणवत आहे.हे खरे की खोटे हे यथावकाश समजेल पण त्यातून तालुक्यातील नेते सजग आणि संवेदनशील असल्याचे मात्र दिसून आले आहे हे मात्र नक्की.
कोपरगाव तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सडे गावातील सडे गाव ते सडे फाटा या एक कि.मी.रस्त्याचे खराब झालेले काम पुन्हा डांबरीकरण करून पूर्ण करण्यात आले असून अनेक रखडलेले रस्त्यांची कामे सुरुवात होत असल्याचे आशादायक चित्र कोपरगाव मतदार संघात दिसत असून त्यामुळे नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
रस्ते ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा मानले जातात.दळणवळणाची साधने सक्षम झाल्यास शिक्षण,आरोग्य,शेतीमालाची वाहतूक आणि दैनंदिन जीवन सुलभ होते.याच उद्देशाने आ. काळे यांनी कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासनाच्या विविध योजनांतून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे.या निधीतून अनेक रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन होवूनही हि कामे मुदत संपली तरी सुरु झाली नव्हती व काही रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत होती.त्यामुळे त्यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजेनेच्या अधिकाऱ्यांची व रस्त्यांची कामे घेतलेल्या ठेकेदारांची एकत्रित बैठक घेवून त्यांना रखडलेल्या रस्त्याच्या कामावरून चांगलेच खडसावले होते.तसेच अधिकाऱ्यांना विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी मांडण्याचा ईशारा देवून मुजोर व निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांना कायमचे काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना केल्या होत्या.
त्यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्याचा अतिशय सकारात्मक परिणाम झाला असून खराब रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली असून नुकताच डांबरीकरणाचे काम पूर्ण झालेला सडे गाव ते सडे फाटा हा एक कि.मी.रस्ता याचे उदाहरण बनले आहे.त्या बैठकीत उपस्थित असलेल्या रस्त्यांचे काम घेतलेल्या ठेकेदारांनी रखडलेल्या रस्त्याचे किती दिवसात काम पूर्ण होईल याची अंतिम तारीख दिलेली आहे.दिलेल्या तारखेच्या आत काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदारही अंग झटकून कामाला लागले असून पुढील आठवड्यात अशाच रखडलेल्या वारी-कान्हेगाव रस्त्याचे काम सुरु होणार आहे.त्यामुळे मतदार संघातील नागरिक सुखावले असून मुजोर ठेकेदारही रस्त्यांची कामे सुरु करण्यासाठी यंत्र सामुग्री जमा करू लागले असून लवकरच रखडलेल्या सर्वच रस्त्यांची कामे पूर्ण होणार असल्याचे ठेकेदारांच्या सुरु असलेल्या कामावरून दिसून येत आहे.



