जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

तालुक्यातील रस्त्याची दुरवस्था,शेतकऱ्यांची तक्रार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव – (प्रतिनिधी )

कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव ग्रामपंचायत हद्दीतील येसगाव ते ब्राह्मणगाव रस्त्यावर गोदावरी डाव्या कालव्याजवळ असलेल्या गाडे वस्ती जवळील पुलापासून ते बोरावके वस्ती ते टाकळी रस्त्याची मोठी दयनीय अवस्था झालेली असून त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी नुकतीच आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.

  

पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले असले तरी अद्याप विहिरींची भूजल पातळी वाढलेली नाही.मात्र थुईथुई पावसावर पिके जोमदार वाढली असून सदरचा पाऊस तनपोशा झाला आहे.त्यामुळे पाऊस जास्त नसताना केवळ रस्ते खराब करण्याची त्यांनी कुठलही कसर सोडली नाही परिणामी राज्य मार्गासह ग्रामीण रस्त्यांची वाट लागली आहे.त्याला कोपरगाव तालुक्यातील रस्ते अपवाद नाही.

कोपरगाव तालुक्यात पाऊस कमी आणि अवसान जास्त अशी स्थिती आढलून येत आहे.पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले असले तरी अद्याप विहिरींची भूजल पातळी वाढलेली नाही.मात्र थुईथुई पावसावर पिके जोमदार वाढली असून सदरचा पाऊस तनपोशा झाला आहे.त्यामुळे पाऊस जास्त नसताना केवळ रस्ते खराब करण्याची त्यांनी कुठलही कसर सोडली नाही परिणामी राज्य मार्गासह ग्रामीण रस्त्यांची वाट लागली आहे.त्याला कोपरगाव तालुक्यातील रस्ते अपवाद नाही.कोपरगाव तालुक्यातील रस्ते मोठया प्रमाणावर नादुरुस्त झाले आहे.त्यातच ब्राह्मणगाव ग्रामपंचायत हद्दीतील येसगाव ते ब्राह्मणगाव रस्त्यावर गोदावरी डाव्या कालव्याजवळ असलेल्या गाडे वस्ती जवळील पुलापासून ते बोरावके वस्ती ते टाकळी रस्त्याची मोठी दयनीय अवस्था झालेली असून सदर रस्त्यासाठी गोदावरी डाव्या कालव्यावरील वरील रस्त्याशिवाय शेतकऱ्यांना दुसरा पर्याय नाही.या परिसरात गाढे वस्ती,आसने वस्ती,वाबळे वस्ती,गंगावणे वस्ती,माकुणे वस्ती,गायकवाड वस्ती,महाजन वस्ती,शिंदे वस्ती,साबळे वस्ती,हुळेकर वस्ती,पवार वस्ती तसेच फळबाग सोसायटी,इत्यादी परिसरातील नागरिकांना कायमस्वरूपी शेतीच्या कामासंदर्भात जाणे येणे करावे लागते.या परिसरातील नागरिकांनी कोपरगाव येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात रस्ता दुरुस्ती संदर्भात अर्ज दिलेला होता.त्याची प्रत तत्कालीन तहसीलदार कोपरगाव यांना ही दिलेली होती.तरी त्याची दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहेत.गेल्या तीस वर्षापासून या रस्त्याची ही दयनीय अवस्था आहे.त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि महसुली विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी तेथील शेतकऱ्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close