जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

…या तालुक्यात रस्त्यासाठी मोठा निधी मंजूर,पण…

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी )

कोपरगाव मतदार संघातील ३९ किलोमीटर रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ संशोधन विकास अंतर्गत तब्बल ६३.१० कोटी निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ.अशुतोस काळे यांनी दिली आहे.मात्र या कामांच्या गुणवत्तेवर नियंत्रण कोण ठेवणार असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.

  

आमच्या प्रतिनिधीने झगडे फाटा ते जवळके या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत,’न्यूजसेवा’ पोर्टलवर बातमी प्रसिद्ध केल्यावर मात्र आ.आशुतोष यांनी त्याची दखल घेऊन तत्काळ त्या रस्त्याची पाहणी केली व अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली मात्र तो पर्यंत रस्ता जवळपास पूर्ण झाला होता.(अद्याप फर्निचर बाकी आहे) आता याचे संबधित लोकप्रतिनिधी बिल काढणार की; त्या ठेकेदारास अभय देणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.एखाद्या तरी ठेकेदारास याची अद्दल घडल्याशिवाय ही मंडळी ठिकानावर येणार नाही हे वास्तव आहे.

  कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांचा मोठ्या प्रमाणावर बोऱ्या वाजला होता.अलीकडील काळात कामे होताना दिसत असले तरी त्यांच्या गुणवत्तेवर मात्र मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.त्यामुळे तालुक्यातील सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यावर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.संबधित यंत्रणा काम करताना त्यावर निरीक्षक नियुक्ती करत आहे की नाही याचा खुलासा होणे गरजेचे बनले आहे.नुकत्याच पूर्ण झालेल्या झगडे फाटा ते जवळके या रस्त्याची काम पूर्ण होण्याच्या आधीच वाट लागली असून दहा कोटींचा चुराडा झाला आहे.ही कामे जनतेसाठी आहे की,ठेकेदार  व अधिकारी यांची खपाटीला गेलेली पोटे भरण्यासाठी आहे असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.यावर कोणीही चकार शब्द बोलण्यास तयार नाही.नाही म्हणायला आमच्या प्रतिनिधीने याबाबत,’न्यूजसेवा’ पोर्टलवर बातमी प्रसिद्ध केल्यावर मात्र आ.आशुतोष यांनी त्याची दखल घेऊन तत्काळ त्या रस्त्याची पाहणी केली व अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली मात्र तो पर्यंत रस्ता जवळपास पूर्ण झाला होता.(अद्याप फर्निचर बाकी आहे) आता याचे संबधित लोकप्रतिनिधी बिल काढणार की; त्या ठेकेदारास अभय देणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.एखाद्या तरी ठेकेदारास याची अद्दल घडल्याशिवाय ही मंडळी ठिकानावर येणार नाही हे वास्तव आहे.अधिकारी टक्का घेऊन त्या कामाच्या गुणवत्तेचा बोऱ्या वाजविण्यास मोकळे होतात व ठेकेदारांना भ्रष्टाचारास रान मोकळे करून देताना दिसत आहे.यात लोकप्रतिनिधींचा टक्का आहे किंवा काय यावर अद्याप खुलासा झालेला नाही.मागील पंचवार्षिक मध्ये मात्र त्याचा महापूर आला होता.यावेळी असे झाले तर मग जनतेला कोणीही वाली राहणार नाही.आता अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर अवलंबून रहाणे धोक्याचे बनले आहे.त्यामुळे हात पाय मोडण्याची जीव गमावण्याची व वित्तीय हानीची वेळ जनसामन्यावर येते त्यामुळे त्यांच्यावर या कामावर लक्ष ठेवण्याचे दायित्व येत आहे.या पार्श्वभूमीवर ही मोठ्या कामाची मंजुरी झाली आहे.त्यामुळे ग्रामस्थांना डोळ्यात तेल घालून ही कामे करून घेण्याचा प्रसंग येणार असून त्याची मानसिक तयारी त्यांनी नक्कीच केली पाहिजे तरच त्यांना व  रस्त्यांना उज्वल भविष्य राहणार आहे.

  दरम्यान कोपरगाव तालुक्यातील या मंजूर रस्त्यात मतदार संघातील एकूण ३९ किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामासाठी ६३.१० कोटी निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आहे.
   यामध्ये ओगदी ते करंजी रस्ता ४.८७ कोटी,कुंभारी ते बडे वस्ती,काळे वस्ती ते रामा-७ रस्ता ०६.०९ कोटी, एम.डी.आर.-४ मुखेड फाटा ते सांगवी भुसार रस्ता ५.३५ कोटी,एम.डी.आर.-४ ते मायगाव देवी रस्ता ०८.१२ कोटी, राज्यमार्ग ७ ते कोळपेवाडी ते कोळगाव थडी रस्ता ४.९१ कोटी, रा.मा.०७ ते कोळपेवाडी-सुरेगाव रस्ता १०.०१ कोटी,रा.मा.३५ वेस,सोयगाव ते काकडी,मल्हारवाडी रस्ता ११.५७ कोटी,सोनारी ते टाकळी रस्ता ६.६९ कोटी,टाकळी ते देवी वस्ती ते एम.डी.आर.-०८ रस्ता ५.४५ कोटी या रस्त्यांचा समावेश आहे.दरम्यान या मंजूर कामाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close