जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

…या आठ गावात ८४ लाखांचा निधी मंजुर- माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव मतदार संघातील विविध विकास कामांना निधी मिळावा यासाठी  सादर केलेल्या प्रस्तावाची महायुती शासनाने दखल घेवून आ.आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून  कोपरगाव मतदार संघातील आठ गावातील ८४ लक्ष निधीच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विकासकामांना निधी मिळविण्यासाठी आ.काळे यांच्या प्रयत्नांना यश मिळत असून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मधून ८४ लक्ष निधीच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याचा दावा आहे.

    सत्ताधारी पक्षाचा आमदार असतांना या संधीचा उपयोग करून घेत मतदार संघाच्या विकासासाठी सातत्याने धडपड करून मतदार संघाच्या विकासासाठी निधी मिळविण्याचे आ. आशुतोष काळे यांचे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मागील साडे चार वर्षात २९०० कोटीच्या निधी आणला असल्याची माहिती मिळाली आहे.

विकासकामांना निधी मिळविण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना नियमितपणे यश मिळत असून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मधून ८४ लक्ष निधीच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये मतदार संघातील राहाता तालुक्यातील चितळी येथील श्री.मारूती मंदिर ते (स्टेशन वरील) ग्रा.पं.मालमत्ता क्र. ८६२ या जागेत सुशोभिकरण करणे (१० लक्ष),धनगरवाडी येथील श्री.हनुमान मंदिर परिसरात ग्रामपंचायत मालमत्ता क्र.१ जागेत पेव्हर ब्लॉक बसविणे(०९.९९ लक्ष),रामपूरवाडी येथील श्री. स्वामी समर्थ मंदिर परिसरात ग्रामपंचायत मालमत्ता क्र. ८५२ जागेत पेव्हर ब्लॉक बसविणे (०४ लक्ष),कोपरगाव तालुक्यातील जेउर पाटोदा येथील ग्रा. पं. गट क्र. उपविभाग ७०/९ जागेत सभागृह बांधणे (१० लक्ष), भोजडे येथील ग्रा. पं. मालमत्ता क्र. ३१९ जागेत सभागृह बांधणे (०९.९९ लक्ष), मळेगांव थडी येथील चारी नं.५ तुकाराम रक्ताटे वस्ती ते योगेश खोंडेवस्ती रस्ता करणे (१९.९९ लक्ष), रांजणगांव देशमुख येथील चांनखनबाबा मंदिर ते अशोक खालकर पर रस्ता करणे (०९.९९ लक्ष), लौकी गांव ते कोळनदी (तळेगाव रोड) रस्ता करणे (०९.९९ लक्ष) या विकास कामांना या निधीतून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याबद्दल आ.काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथज शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार,महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे आभार मानले आहे.तसेच चितळी,धनगरवाडी,रामपूरवाडी,जेऊर पाटोदा, भोजडे,मळेगाव थडी,रांजणगाव देशमुख या गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close