पर्यटन व तीर्थक्षेत्र
शिर्डीतील श्री साई संस्थानला अडीच वर्षांनी मिळाले नवीन विश्वस्त

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
देश-विदेशात प्रसिद्ध असलेल्या श्री.साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळावर राज्य सरकारने सहा सदस्यांची नियुक्ती केली आहे.शासनाच्या या निर्णयामुळे साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. रिकाम्या जागांवर नियुक्त करण्यात आलेल्या या सदस्यांमध्ये मीना शेखर कांबळी,सुनील सदाशिव शेळके,सुभाष दिगंबर लाखे,डॉ. जालिंदर बाळाजी भोर,दत्तात्रय पांडुरंग सावंत आणि शिर्डीतील शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन पराजी कोते यांचा समावेश आहे.राज्य सरकारने एका अधिसूचनेद्वारे या नियुक्त्या केल्या आहेत.
राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार मीना शेखर कांबळी यांची महिला वर्गातून,सुनील सदाशिव शेळके यांची सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या वर्गातून,सुभाष दिगंभर लाखे यांची सार्वजनिक प्रशासन वर्गातून,डॉ.जालिंदर बाळाजी भोर यांची सार्वजनिक आरोग्य वर्गातून,दत्तात्रय पांडुरंग सावंत यांची ग्रामविकास वर्गातून आणि सचिन पराजी कोते यांची सर्वसाधारण वर्गातून सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री.साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळावर झालेल्या सदस्यांच्या नियुक्तीच्या अधिसूचनेनुसार मीना शेखर कांबळी यांची महिला वर्गातून,सुनील सदाशिव शेळके यांची सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या वर्गातून,सुभाष दिगंभर लाखे यांची सार्वजनिक प्रशासन वर्गातून,डॉ.जालिंदर बाळाजी भोर यांची सार्वजनिक आरोग्य वर्गातून,दत्तात्रय पांडुरंग सावंत यांची ग्रामविकास वर्गातून आणि सचिन पराजी कोते यांची सर्वसाधारण वर्गातून सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर शिर्डी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष हे पदसिद्ध विश्वस्त रहाणार आहेत.
राज्य सरकारला हे विश्वस्त नेमण्यास अडीच वर्षांनी सवड मिळाली असून त्याबद्दल साई भक्तांनी समाधान व्यक्त केले आहे.नूतन विश्वस्तांचे शिर्डी आणि परिसरातून स्वागत होत आहे.