जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

शिर्डीत रंगपंचमी,श्रींची रथयात्रा मिरवणुक काढण्‍याबाबत…हा निर्णय

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

नगर जिल्‍हाधिकारी यांच्‍या प्रतिबंधात्‍मक आदेशान्‍वये कायदा सुव्‍यवस्‍थेच्‍या कारणास्‍तव तातडीने श्रींची गुरुवारची पालखी व रंगपंचमी निमित्‍ताने निघणारी रथयात्रा मिरवणुक स्‍थगीत करण्‍यात आली होती.परंतु साईभक्‍तांची श्रध्‍दा व त्‍यांची मागणी आणि मंदिराची प्रथा परंपरा सुरु ठेवण्‍याच्‍या उद्देशाने संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी जिल्‍हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांच्‍याशी तातडीने दुरध्‍वनीवरुन संपर्क साधुन रथयात्रा मिरवणुक सुरु करण्‍याबाबत मागणी करण्‍यात आलेली होती.त्‍यास मान्‍यता मिळाली असून दिनांक २२ मार्च रोजी सायंकाळी ०५ वाजता रंगपंचमी निमित्‍ताने शिर्डी गावातून श्रींची रथयात्रा मिरवणुक काढण्‍यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

“दि.२२ मार्च रोजी सायंकाळी ०५ वाजता रंगपंचमीनिमित्‍त प्रथेप्रमाणे शिर्डी गावातून श्रींची रथयात्रा मिरवणूक काढण्‍यात येणार असून भाविकांनी कायदा सुव्‍यवस्‍थेच्‍या नियमांचे पालन करुन या रथयात्रेचा लाभ घ्‍यावा. तसेच साईभक्‍तांनी व ग्रामस्‍थांनी याबाबत संस्‍थानला सहकार्य करावे”-आशुतोष काळे,अध्यक्ष,साईबाबा संस्थान शिर्डी.

जिल्‍हाधिकारी यांच्‍यामार्फत कोरोना विषाणूचे पार्श्वभुमीवर दि.१७ मार्च ते दि.२२ मार्च २०२२ अखेर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) चे प्रतिबंधात्मक आदेश पारित करणेत आला आहे.सदर आदेशात (क) नुसार कोणत्याही व्यक्तींच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे.तसेच (इ) नुसार जाहिरपणे घोषणा देणे,गाणे म्हणणे,वाद्य वाजविणे, ध्वनिवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसाच्या तसा ऐकवणारा उपकरण संच वापरणे किंवा वाजविणे इत्‍यादी मनाई करणेत आलेली आहे.त्यास अनुसरुन शिर्डी पोलीस स्टेशन शिर्डी यांनी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी मार्फत निघणारी गुरुवारची पालखी सोहळा तसेच रंगपंचमी निमित्त निघणारे रथयात्रा मिरवणूक स्थगित होणेस पत्राव्‍दारे आदेशीत केलेले होते.जिल्हाधिकारी यांचे प्रतिबंधात्मक आदेश व शिर्डी पोलीस स्टेशनचे पत्राचा विचार करता कायदा व सुव्‍यवस्‍था कारणास्‍तव प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करणे आगत्याचे असल्याने दि.१७ मार्च ते दि.२२ मार्च २०२२ अखेर पालखी व रथ मिरवणूक पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचे फेरबदल करण्‍यात आले होते. तसेच श्री साईबाबांची दि.१७ मार्च २०२२ रोजीची नित्याची गुरुवारची पालखी ही रद्द करण्याचा निर्णय तातडीने घ्‍यावा लागला होता.
तथापि भाविकांची श्री साईबाबांप्रती असलेली श्रध्‍दा व त्‍यांची रंगपंचमीनिमीत्‍त श्रींची निघणारी रथयात्रा मिरवणूक काढणेबाबत होणारी मागणी आणि मंदीराची प्रथा परंपरा सुरु ठेवण्‍याचे उद्देशाने संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी तातडीने जिल्हाधिकारी यांना ईमेलव्‍दारे प्रस्‍ताव पाठवुन तसेच त्‍यांच्‍याशी त्‍वरीत दुरध्वनीद्वारे संपर्क साधुन संस्थानमार्फत दि.२२ मार्च रोजी रंगपंचमीनिमित्त श्रीसाईबाबांचे रथयात्रा मिरवणुकी काढणेस विनंती केली. त्‍यास जिल्‍हाधिकारी यांनी मौखीक मान्यता दिली आहे. तसेच पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांचेशी देखील मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी दुरध्वनीद्वारे संपर्क करुन चर्चा केली असता, त्‍यांनी रथयात्रा मिरवणुकीकरीता सर्वोत्‍परी मदत करण्‍याचे आश्‍वासन दिले असुन कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी जादा पोलीस संरक्षण देणार असल्याचे ही त्‍यांनी सुचित केलेले आहे.
त्‍यानुसार दिनांक २२ मार्च रोजी सायंकाळी ०५ वाजता रंगपंचमीनिमित्‍त प्रथे प्रमाणे शिर्डी गावातून श्रींची रथयात्रा मिरवणूक काढण्‍यात येणार असून भाविकांनी कायदा सुव्‍यवस्‍थेच्‍या नियमांचे पालन करुन या रथयात्रेचा लाभ घ्‍यावा. तसेच साईभक्‍तांनी व ग्रामस्‍थांनी याबाबत संस्‍थानला सहकार्य करावे असे आवाहन संस्‍थानचे व्‍यवस्‍थापन मंडाळाचे अध्‍यक्ष ना.आशुतोष काळे व मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत आणि विश्‍वस्‍त मंडळाचे सदस्‍य यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close