जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

पंढरपूर रेल्वे पूर्ववत सुरू करा -…या सरपंचाची मागणी

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

संवत्सर -(प्रतिनिधी)

   देश-विदेशात प्रसिद्ध असलेल्या शिर्डी येथील साईबाबांची आणि पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या विठोबा या दोन तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या शिर्डी -पंढरपूर अशी जलद गती पॅसेंजर रेल्वे गाडी पाच वर्षापासून बंद असल्याने नागरिकांना आणि वारकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे त्यामुळे ही रेल्वे सेवा पुणे रेल्वे विभागाने पूर्ववत सुरू करावी अशी मागणी कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका विजय थोरात यांनी आगामी आषाढी यात्रेच्या निमित्ताने केली आहे.

   “सदर आषाढी एकादशी काही आठवड्यावर येऊन ठेपली आहे.शिर्डी-मुंबई-पंढरपूर अशी सेवा सुरू झाली तर वारकऱ्यांसह भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते.ते राज्य परिवहन बस सेवेऐवजी रेल्वे सेवेला प्राधान्य देत आहे कारण बसने जाण्यास तब्बल सात तास लागत असतात.तेव्हा रेल्वे विभागाने शिर्डी मुंबई जलद गती पॅसेंजर सेवा थेट पंढरपूरपर्यंत सुरू करण्यात यावी”- सारिका विजय थोरात,सरपंच,जवळके ग्रामपंचायत,ता.कोपरगाव.

  आषाढी वारी (पंढरपूर) म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय.’वारकरी संप्रदाय’ म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय.या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी.या वारीमध्ये अनेक जाति-धर्माचे लोक भाविक भक्त सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात.वारी हा एक मोठा आनंद सोहळा असतो.त्यामुळे लाखो भाविक उपस्थित असतात.शिर्डी आणि परिसरातील गावामधील भाविक त्याला अपवाद नाही.याभागातून जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मागणी  केल्याने शिर्डीहून पंढरपूर साठी एक रेल्वे सुरू केली होती.मात्र काही वर्षांपूर्वी ती कोणतेही कारण न देता बंद केली होती.परिणामी अनेक वारकऱ्यांची गैरसोय झाली होती.या मार्गावर हा प्रवास फक्त ११० रुपयात होत होता.मात्र पाच वर्षापासून ही रेल्वे सेवा खंडित करण्यात आली आहे.शिर्डी-पंढरपूर ही रेल्वे पहाटे पाच वाजता निघत असे,ती साडेबारा एक पर्यंत पंढरपूरला पोहोचत असे.मात्र सदर रेल्वे आता अज्ञात कारणाने बंद करण्यात आली आहे.त्यामुळे अनेक वारकऱ्यांसह भाविकांमध्ये मोठी नाराजी आहे.दोन तीर्थक्षेत्राचा जोडणारी ही रेल्वे सेवा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी काही भावी व सरपंच सारीका विजय थोरात यांनी शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचेकडे केली आहे.

    सदर निवेदनावर निळवंडे कालवा कृती समितीचे नानासाहेब जवरे,एस.के.थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,माजी उपसरपंच डी.के.थोरात,विजय थोरात,गोरक्षनाथ थोरात,गोरक्षनाथ थोरात,विश्वनाथ थोरात,नवनाथ थोरात,गोरक्षनाथ शिंदे,उत्तमराव थोरात,अशोक शिंदे,चंद्रकांत थोरात,रामनाथ थोरात,सदस्य भाऊसाहेब थोरात,मीना विठ्ठल थोरात,वनिता रखमा वाकचौरे,इंदुबाई नवनाथ शिंदे,रोहिणी गोरक्षनाथ वाकचौरे,अरुण थोरात,गणेश थोरात आदींनी केली आहे.

   सदर आषाढी एकादशी काही आठवड्यावर येऊन ठेपली आहे.शिर्डी-मुंबई-पंढरपूर अशी सेवा सुरू झाली तर वारकऱ्यांसह भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते.ते राज्य परिवहन बस सेवेऐवजी रेल्वे सेवेला प्राधान्य देत आहे कारण बसने जाण्यास तब्बल सात तास लागत असतात.तेव्हा रेल्वे विभागाने शिर्डी मुंबई जलद गती पॅसेंजर सेवा थेट पंढरपूरपर्यंत सुरू करण्यात यावी अशी मागणी त्यांनी शेवटी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचेकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close